अनंत संख्ये, बोईसर
तारापूर येथे वायुगळती ; चौघाचा मृत्यू तर दोन जण जख्मी,
काल दुपारी बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडले फर्मास्युटिकल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या युनिट क्र.एफ – १३ च्या नायट्रोजन रिऍक्शन टाकीतून गॅसगळती होऊन चार कामगार मृत्यूमुखी पडले.तर अन्य दोघेजण गंभीर झाले.
दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असुन कंपनीत कामकाज सुरु असताना अचानक ही गळती सुरु झाली.या दुर्घटनेत
कल्पेश राऊत,वय ४३ राहणार मु.पो चिंचणी,ता. डहाणू,बंगाली ठाकूर,वय ४६, राहणार-अथमलगोला,पटना ( बिहार ),
धीरज प्रजापती,वय -३१, राहणार – शिवाजीनगर, सालवड ( बोईसर )
कमलेश यादव,वय-३१ राहणार,शिवाजीनगर,सालवड ( बोईसर ),मुळगाव – सेठाकोली,पोस्ट – बैजाबारी रौनापार,आजमगड ( यू.पी.) या चौघाचा मृत्यू झाला तर रोहन शिंदे,वय ३५ वर्षे,रा.- १०३,बिल्डिंग नंबर -१०,इ विंग,अमृत रेसिडेन्सी,सरावली बोईसर,निलेश चंद्रकांत हाडल,वय – ३७ वर्ष,राहणार – पाले गावठाणपाडा आगवन,डहाणू रोड, ता.डहाणू,हे दोघे गंभीर जख्मी झाले.या दोघाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

