जव्हार, प्रतिनिधी,
जव्हार येथे विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन,
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गोरठण येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी माl अशोक पाटील ( जि.प. पालघर ) यांनी नुकतीच भेट दिली.यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना जीवनात निश्चित ध्येय ठेवण्याचे व आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.या प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबन, इंग्रजी संवादकौशल्य, संगणकाचा वापर आणि सततच्या चाचण्यांमधून आत्मविश्वास वाढवणे, याविषयी महत्त्व पटवून दिले.
दर शनिवारी इंग्रजी संवादाचा सराव करणे,
संगणकाचा अधिकाधिक वापर करणे,
इंग्रजी,गणित व विज्ञान या विषयांच्या दर महिन्याच्या चाचण्या घेणे,
स्वतःची ओळख निर्माण करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करणे,
अशा सूचना केल्या.
अशोक पाटील यांनी भेटी दरम्यान शाळेतील भौतिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.शिक्षक व विद्यार्थिनींशी संवाद साधताना ते म्हणाले,
“विद्यार्थिनींनी आत्मविश्वास आणि मेहनत या दोन गोष्टींना कवटाळले, तर त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.”
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना भोईर, लेखालिपिक गिरीषा वाजे, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,

