- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, अश्विनी बिद्रे हत्या : अभय कुरुंदकर सह अन्य दोन जण दोषी तर अन्य एकाची निर्दोष सुटका, सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज पनवेल येथील सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर,महेश फाळणीकर व कुंदनलाल भंडारी या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.सहा.पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर निकाल लागला आहे.आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य दोघांना हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.तर आरोपी क्र.दोन राजू पाटील याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.पनवेल येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. १४ जुलै २०१६ रोजी अश्विनी बिद्रे…
नाशिक प्रतिनिधी, आदिवासींच्या आंदोलनानंतर नाशिक पंचायत समितीकडून आदिवासी वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू, आदिवासींना पाणीपुरवठा करण्यास नाशिक पंचायत समिती आर्थिक आणि प्रशासकीय कारणे सांगून पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करत होती.त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुक्यातील विविध वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासींनी नाशिक पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन आंदोलन केले. पंचायत समितीकडे आदिवासींना पाणी देण्यास पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पंचायत समितीला पैसे देऊ,असे सांगून आदिवासींनी ” भिक मागो, ” आंदोलन करत निधी गोळा केला आणि तो पाण्यासाठी पंचायत समितीला दिला.आदिवासी या देशाचे नागरिक नाहीत का ? त्यांना पाणी मिळण्याचा हक्क नाही का ? असा प्रश्न आदिवासी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारला.आदिवासींच्या…
वसंत भोईर,वाडा वाड्यात किती शेतकऱ्यांनी केली मातीची आरोग्य तपासणी ? आपल्या शेतीची माती भरघोस पीक घेण्यायोग्य असावे,यासाठी किमान एक वर्षआड तरी माती परीक्षण करावे यासाठी जनजागृती केरण्यात येत असते.परंतु अनेक शेतकरी या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांनी मातीची आरोग्य तपासणी केल्यास मातीतील खनिजांच्या प्रमाणानुसार खत व्यवस्थापन करणे,सोयीचे होत असते. मात्र अनेक शेतकरी माती परीक्षण न करताच रासायनिक खतांचा वापर करत असतात.सामान्यत: शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षातून एकदा माती परीक्षण करायला हवे.मात्र, वर्षानुवर्ष शेतात तेच पीक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. तालुक्यात काही शेतकरी माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करीत असल्यामुळे त्यांचे पीक जोमात येते…
दीपक मोहिते, ” केवळ कोडगेपणा,” मंत्र्यांच्या संवेदना स्मशानातील सरणावर जळून केंव्हाच खाक झाल्या आहेत…. राज्यात असलेल्या महायुतीच्या असंवेदनशील सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार क्रूर चेष्टा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आठवड्यापूर्वी घुमजाव केले असताना दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना विचारतात की सरकार तुमच्या प्रत्येक कामासाठी पैसे देत असताना,तुम्हाला कर्जमाफीच्या पैश्यातून आपल्या मुला- मुलींची लग्ने का करावीशी वाटतात ? हा निव्वळ कोडगेपणाच नाहीतर निर्लज्जपणा देखील आहे. महायुतीच्या असंवेदनशील सरकारमध्ये बिनडोक व ज्यांच्या संवेदना मेल्या आहेत,असे अनेक मंत्री आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन इंजिनच्या सरकारने ” आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,” असे जाहीर आश्वासन दिले…
दिपक मोहिते, ” तू तू,मै मै,” बसेस खरेदी प्रकरणी एसटी महामंडळ व परिवहन विभाग आमनेसामने, महाराष्ट्र एसटी महामंडळाने ५ हजार १५० वीजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार इव्हे ट्रान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती.पण वेळेत बसेस पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ठरलेल्या मुदतीत बसेस न पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्यावरून आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व एसटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्यात तू तू मै मै सुरु झाले आहे.दरम्यान सरकार कंपनीवर कारवाई करण्यास घाबरत आहे का ? असा सवाल महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारला विचारला आहे. वीजेवरील बसच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार यांनी स्वतःपासून सुरुवात करावी… राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला.या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात त्यांनी आपल्या भाषणात पदाधिकारी व कार्यकर्त्याना सार्वजनिक जीवनात वावरताना नीट वागा,कोणाचा अवमान करू नका,अशा टीप्स दिल्या.वास्तविक अजित पवार यांचे नीट वागा व कोणाचा अवमान करू नका,या दोन वाक्याशी कधीही दुरान्वयाने संबंध आला नाही,कारण त्यांच्या भाषणातील बेताल वक्तव्याने ते अनेकदा अडचणीत आले होते.आज तेच अजित पवार आपल्या कार्यकर्त्याना मानभावी सल्ला देत आहेत.त्यांच्यामध्ये झालेला हा बदल स्वागतार्ह असला तरी तो किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे.…
वसंत भोईर,वाडा वाड्यात वादळ वा-यासह जोरदार पाऊस,घरांचे मोठे नुकसान, वाडा तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडला.या अवेळी आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.वादळ वा-यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.तर आंबा पिकासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरांवरील छप्परे उडल्याने मोठे नुकसान झाले आहे. घोणसई मेट रस्त्यावर वादळ वा-यात एक झाड उन्मळून पडले,त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती.येथे असलेल्या कंपनीने हायड्राच्या सहाय्याने हे तुटलेले झाड रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.मोहोट्याचा पाडा येथे वादळ वा-यात अनेक घरांवरील छपरे उडाली.वादळ वा-यात कांबारे परिसरातील आंब्यांची अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अवेळी…
जव्हार प्रतिनिधी, हिरडपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न, श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित एकलव्य प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, हिरडपाडा,जव्हार येथे दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी करिष्मा नायर (भा.प्र.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना भावी काळात शिक्षणाची दिशा मिळावी, तसेच योग्य मार्गदर्शनाच्या आधारे आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर निवडता यावे,असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.यामध्ये सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती जव्हार तालुका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांनी विविध शैक्षणिक आणि व्यवसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या…
शशिकांत ठाकूर,कासा भरधाव कंटेनरचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथील अल्फा हॉटेलजवळ आज भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला.कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी महामार्गावरील मध्यवर्ती संरक्षण भिंतीवर ( कठडा ) जाऊन धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कंटेनरमधील माल आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त कंटेनर गाडी ही गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होती, चारोटी येथे अचानकपणे हा अपघात घडला महामार्ग वाहतूक नियंत्रण पोलिस चारोटी यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त वाहन हटवण्यात आले .दरम्यान यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दीपक मोहिते, प्रादेशिक पक्ष संपवणे,हा भाजपचा छुपा अजेंडा… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर गेल्या तेरा वर्षात भाजपने शिवसेनेला संपवण्याचे कसे प्रयत्न केले व त्यामध्ये ते कसे यशस्वी झाले ? यावर प्रकाश टाकल्यास भाजप प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी कशी कटकारस्थाने करतो,हे दिसून येते.आप,तृणमूल काँग्रेस,शिवसेना,बसपा, समाजवादी पक्ष व ईशान्येकडील लहान पक्षापैकी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ते धक्का देऊ शकले नाहीत.प्रादेशिक पक्षाशी सर्वप्रथम हातमिळवणी करून सत्तेत सहभागी व्हायचं आणि नंतर त्या प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण करायचे,अशी ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे.आंध्र प्रदेशमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पार्टीला असंच संपवले.त्यासाठी त्यांनी तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांना हाताशी धरले.बिहारमध्येही त्यांनी अशीच…
