नाशिक प्रतिनिधी,
आदिवासींच्या आंदोलनानंतर नाशिक पंचायत समितीकडून आदिवासी वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू,
आदिवासींना पाणीपुरवठा करण्यास नाशिक पंचायत समिती आर्थिक आणि प्रशासकीय कारणे सांगून पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करत होती.त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुक्यातील विविध वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासींनी नाशिक पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन आंदोलन केले.

पंचायत समितीकडे आदिवासींना पाणी देण्यास पैसे नसतील तर आम्ही भीक मागून पंचायत समितीला पैसे देऊ,असे सांगून आदिवासींनी ” भिक मागो, ” आंदोलन करत निधी गोळा केला आणि तो पाण्यासाठी पंचायत समितीला दिला.आदिवासी या देशाचे नागरिक नाहीत का ? त्यांना पाणी मिळण्याचा हक्क नाही का ? असा प्रश्न आदिवासी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारला.आदिवासींच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन आदिवासी वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.टँकरद्वारे का होईना,पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने आदिवासी विशेषता महिला आनंद व्यक्त करीत आहेत.

