शशिकांत ठाकूर,कासा
भरधाव कंटेनरचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली,
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथील अल्फा हॉटेलजवळ आज भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला.कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी महामार्गावरील मध्यवर्ती संरक्षण भिंतीवर ( कठडा ) जाऊन धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कंटेनरमधील माल आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातग्रस्त कंटेनर गाडी ही गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होती, चारोटी येथे अचानकपणे हा अपघात घडला महामार्ग वाहतूक नियंत्रण पोलिस चारोटी यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त वाहन हटवण्यात आले .दरम्यान यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

