- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईस्तोवर अनाहूत पाहुण्यापासून लांब राहा.. काल गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या आवेशपूर्ण भाषणाने मनसे सैनिक चांगलेच चार्ज झाले आहेत.या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण पुन्हा हिंदुत्वाकडे वळत असल्याचे संकेत दिले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा विषय आपल्या भाषणाचा प्रमुख मुद्दा बनवला होता.तो १०० % यशस्वी ठरला.त्यांच्या घणाघाती भाषणाने मनसे सैनिक अक्षरशः भारावून गेले होते. आपल्या भाषणात फडणवीस सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.ते म्हणाले,” फडणवीस तुमच्या हातात चांगले राज्य आले आहे,तर चांगला कारभार करा.राज्यासमोर अनेक ज्वलंत विषय आहेत,ते लक्षात घेऊन कारभार करा.आपल्याला जंगल व…
दीपक मोहिते, घणाघाती प्रहार, छावा चित्रपट आल्यानंतर आपल्याला औरंगजेब कळला-राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दादरच्या शिवतीर्थावर भव्य मेळावा पार पडला.या मेळाव्याला खूप वर्षांनी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या अनेक ज्वलंत विषयावर घणाघाती हल्ला चढवला.त्यांनी महायुती सरकारला आपल्या भाषणात चांगलेच खडे बोल सुनावले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारची खिल्ली उडवली. ” औरंगजेबाची सजवलेली कबर काढून त्या जागी एक फलक लावा की ” मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, ” असा सल्ला त्यांनी आपल्या…
सचिन परब,विरार विरार येथील शोभयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्री विठ्ठलनाथ संस्थान विरार, आयोजित नववर्ष स्वागत यात्रा,हे आजच्या गुढीपाडवा सणाचे विशेष आकर्षण ठरले. दुपारी चारच्या सुमारास कलावती आई मंदिर येथून या शोभयात्रेला प्रारंभ झाला.त्यावेळी जोरदार जल्लोष झाला.यानिमित्ताने संपूर्ण विरार शहर भगवामय झाले होते. या शोभायात्रेत तरुण तरुणी,विद्यार्थी,महिला व लहान मुले सहभागी झाले होते.तसेच माजी आ.क्षितिज ठाकुर,माजी नगरसेवक पंकज ठाकूर,अजीव पाटील,ऍड. नयन शहा व हार्दिक राऊत याप्रसंगी उपस्थित होते.या उपक्रमादरम्यान पारंपारिक वेशभूषा,पौराणिक चरित्र वेशभूषा व रील्स स्पर्धा पार पडल्या.शोभायात्रेत तरुण -, तरुणीनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली.सुमारे दोन तास चाललेल्या या शोभयात्रेची अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत होते. सालाबादप्रमाणे यंदाही शोभयात्रेला स्थानिक…
रविंद्र राऊळ, मुंबई केंद्रीयमंत्री पीयूष गोयल रमले शोभायात्रेत… गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत निघालेल्या शोभा यात्रेमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खा.पीयूष गोयल हे चांगलेच रमलेले पाहायला मिळाले. सर्वप्रथम कांदिवली येथील त्यांच्या लोककल्याण कार्यालयात गुढी उभारून त्यांनी पूजा केली. त्यानंतर चारकोप येथील सेक्टर नऊ, बोरीवली,दहिसर,मालाड येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये ते सहभागी झाले. या शोभा यात्रांमध्ये ते लेझिम खेळले,ढोल वाजवला,झेंडा फडकवला,पालखी खांद्यावर घेतली आणि रथही ओढला. त्यांच्या या सहभागामुळे नागरिक आणि कार्यकर्ते चांगलेच सुखावले होते.या शोभयात्रेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शुभम सावंत,विरार, जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण पालकमंत्र्यांनी अवघ्या दीड तासात गुंडाळला… दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या समस्या,अडचणी व प्रश्न घेऊन आले होते. त्यासाठी त्याना चांगलीच पदरमोड करावी लागली.पण या जनता दरबारामध्ये किती कामकाज झाले,याचा लेखाजोगा तपासला तर हा जनता दरबार केवळ देखावा होता. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांना या जनता दरबाराचा अत्यंत वाईट अनुभव आल्याचे news 27 च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.ते म्हणाले, महावितरण कंपनीला स्वीचींग स्टेशनसाठी विरार पश्चिम भागात जमीन हवी होती, त्यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे रीतसर मागणी केली होती.वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आम्हीही महावितरण कंपनीकडे…
दीपक मोहिते, पालघर येथे जनता दरबारचे यशस्वी आयोजन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जनतेला भेडसावत असलेल्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी तसेच त्याचे निराकरण करण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित “ जनता दरबार,” कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. जनता दरबारसारख्या उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होत असतो.विविध विकासकामांच्या बांधणीचा आराखडा अशा दरबारात होणाऱ्या चर्चेतून ठरवणे शक्य होत असते. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणाऱ्या अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे नक्कीच जनतेच्या समस्या कमी होऊन विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु होत असते. या उपक्रमात राज्याचे…
सुरेश वैद्य,पालघर गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीचा निरोप देणे, क्लेशदायक-पालकमंत्री नाईक, शासकीय सेवा करताना सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना एक दिवस सेवानिवृत्त व्हावेच लागते.पण जनतेची मनाभावातून सेवा करणारे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना सेवानिवृत्तीसाठी निरोप देणे, क्लेशदायक असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा निरोप समारंभ काल आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी पालकमंत्री नाईक बोलत होते. यावेळी आ.राजेंद्र गावित,आ.विनोद निकोले, कोकण विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे सहायक जिल्हाधिकारी…
वसंत भोईर,वाडा वाडा वन परीक्षेत्रात खैर तस्करांवर पुन्हा संक्रान्त, तालुक्यातील कंचाड वनपरिक्षेत्रात खैर तस्कर चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती वाडा दक्षता पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचला होता. पण त्याची खबर लागताच अंधाराचा फायदा घेऊन खैर तस्कर पसार झाले.मात्र खैराच्या २४ ओडक्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात वनविभागाला यश आले. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली.वाडा दक्षता पथकाचे वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कंचाड वन परिसरात खैर तस्कर,चोरीच्या उद्देशाने येणार असल्याचे माहिती मिळाली होती. त्यांनी रात्री ९.३० वाजल्यापासून पाळत ठेवली होती.रात्री १.०० ते २.०० च्या सुमारास अंदाजे १५ ते २० इसम खैर झाडे तोडण्याच्या इराद्याने राखीव वन क्षेत्रात घुसले.त्यांनी जंगलात काही उभ्या…
वसंत भोईर,वाडा नववर्ष स्वागत यात्रेने वाडा दुमदुमले गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीतर्फे वाडा शहरात टाळमृदुंग,ढोल ताशे व लेझीमच्या तालावर हिंदू नववर्षानिमित्त स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.या स्वागतयात्रेमध्ये श्रीराम,लक्ष्मण,सीता,हनुमान यांचे देखावे व विविध समाजाच्या संस्कृतीचे दर्शन दाखवणारे देखावे होते. यात्रेच्या मार्गावर दुतर्फा रांगोळ्या काढून वाडावासीयांनी ऐक्याच्या गुढ्या उभारल्या होत्या. सकाळी सात वाजता वाडा येथील श्रीराम मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली.या यात्रेत स्त्री-पुरुष , लहान मुले पारंपारिक वेशभुषा करून सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या तालावर यात्रेतील नागरिक भजने, भक्ती गीत गात होते.फुगड्या, नाच सुरू होते.ही यात्रा वाणी आळी,भानुशाळी आळी,मुख्य बाजारपेठ,परळी नाका,बस स्थानक पंचायत समिती कार्यालय,आगर आळी, गावदेवी मंदिरापासून पुन्हा श्रीराम मंदिरात तिचा…
राजू वाघ,मुंबई गारगाई प्रकल्प व भांडुप जलशुद्धीकरण केंद्र मुंबईसाठी महत्त्वाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाल विधान भवन,मुंबई येथे ” गारगाई धरण प्रकल्प,” यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप,मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,गारगाई प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पातून ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील ५० वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे. उगदा गावाजवळ ( वाडा ) हा प्रकल्प उभारण्यात येत असून या परिसरातील सहा गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व…
