संजय नेवे,विक्रमगड
भाजपचे आजपासून दोन दिवस गाव/वस्ती संपर्क अभियान,
विक्रमगड मंडळ अध्यक्ष रवींद्र भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासुन दोन दिवस विक्रमगड नगरपंचायत हद्दीतील शाळांना भेटी देणे व या भेटीदरम्यान शाळेमधील विद्यार्थ्यांशी शिक्षकांशी संवाद साधणे, अशा अभियानाला सुरुवात झाली.
यावेळी ” गाव वस्ती संपर्क अभियान,” प्रवासी नेते जिल्हास्तरीय कैलाश सहारे तसेच माजी सभापती तथा तालुका सरचिटणीस जिजाताई टोपले,अरुणदादा मोरघा,बूथ प्रमुख संजीवनी ताई माडी व ” गाव/वस्ती संपर्क अभियान,” नगरपंचायत प्रमुख राहुल मोरे यांच्या उपस्थितीत गाव वस्ती अभियान करून विविध गावपाड्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.तसेच शाळा अंगणवाड्या यांनाही भेटी देऊन त्यांची पाहणी केली तसेच जुने भाजपचे कार्यकर्त्यांची भेटीगाठी यावेळी घेण्यात आल्या.या अभियानाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

