नाशिक प्रतिनिधी,
नाशिक महानगरपालिकेतर्फे ” वसुंधरा सप्ताह स्वच्छता मोहीम,”
नाशिक महानगरपालिकेने जागतिक ” माझी वसुंधरा सप्ताह,” साजरा करताना ” वसुंधरा वाचवा,वसुंधरा सजवा,” या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.” या उपक्रमांतर्गत ” माझी नंदिनी,माझी जबाबदारी,” ही विशेष नदी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली.
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी महानगरपालिका नदी संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.त्यांनी नागरिकांना देखील नदी स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ” नदी आपली जीवनदायिनी आहे.तिचे रक्षण करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या मोहिमेमध्ये ” ईलाइट क्लब ऑफ नाशिक,” ही सामाजिक संस्था सहभागी झाली होती. महानगरपालिका शिक्षण विभाग व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने १०० हून अधिक स्वयंसेवकांनी नंदिनी नदी पात्रातील ५०० कि.हून अधिक कचरा गोळा केला. संकलित कचऱ्याची विल्हेवाट महानगरपालिकेकडून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी ” माझी वसुंधरा,माझी जबाबदारी,” या संकल्पनेखाली पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धन,स्वच्छ,हरित जीवनशैली आणि आगामी हरित कुंभाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
ही संपूर्ण मोहीम कर उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत व उपायुक्त पर्यावरण तथा गोदावरी संवर्धन नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.यावेळी महानगरपालिका शिक्षण विभाग,घनकचरा विभाग व मनपाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाशिक महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नंदिनी नदी स्वच्छतेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली.

