मनिष धानू,डहाणू
डहाणू जनता को-ऑप.बँकेत डहाणू विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी,
डहाणू जनता को-ऑप. बँकेच्या निवडणूकित डहाणू विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.या निवडणुकीत प्रगती पॅनलचा दारुण पराभव झाला.त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.या प्रगती पॅनलने प्रचारात डहाणू विकास आघाडीवर विविध आरोप केले होते.पण डहाणूवासियांनी त्याकडे दुर्लक्ष करत डहाणू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मते टाकली.
या निवडणुकीत प्रगती पॅनलने हवा निर्माण केली होती.पण त्यांना सर्वच्या सर्व जागा लढवता आल्या नाहीत.त्यामुळे डहाणू विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १३ जागासाठी २२ उमेदवार रिंगणात होते.एकूण ७ हजार ५२७ मतदारांपैकी ४ हजार २१ मतदारांनी मतदान केले.प्रगती पॅनलने आपल्या प्रचाराचा भर,हा नकारात्मक प्रचारावर,तर डहाणू विकास आघाडीने बँकेची प्रगती,सभासदांचे हित व बँकेची भावी वाटचाल,यावर प्रचारात भर ठेवला होता. त्यांचा हा प्रचार मतदारांच्या पसंतीला उतरला व प्रगती पॅनलचे अक्षरशः पानिपत झाले.विजयी उमेदवारामध्ये भरत राजपूत,मिहीर शहा,कुमार नागशेठ,शमी पीरा व जगदीश राजपूत यांचा समावेश आहे.विजयी झाल्यानंतर भरत राजपूत आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले,बँकेत राजकारण नको असे आमचे मत होते.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी,यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो,पण दुर्देवाने ती होऊ शकली नाही.आता बँकेच्या वाढीसाठी आम्ही सर्वजण झटणार आहोत.
Trending
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…

