Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर – आ.हरिश्चंद्र भोये, जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा,हे डोंगरी व आदिवासीबहुल तालुके असून, येथे प्रामुख्याने हंगामी शेती केली जाते.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे नुकतीच खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत आ.हरिश्चंद्र भोये यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकल्या व विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बोलताना आ. भोये, आपल्या भाषणात म्हणाले, ” शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.कृषी विभागातील अधिकारी,कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना मार्गदर्शन करावे.मधमाशी पालन,फळबाग,फुलबाग लागवडीसाठी सहकार्य करावे. गरीब शेतकऱ्यांसाठी वॉल कंपाऊंडसारख्या सुविधांची मागणी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे करावी.पुढे ते म्हणाले, ” पीक विमा योजनांचा लाभ अनेक…

Read More

दीपक मोहिते, पुणे वनजमीन घोटाळा ; माजी महसूलमंत्री नारायण राणे अडचणीत, राजकारणी लोक सरकारी जमिनीची कशी लूट करतात,हे आपण आजवर घडलेल्या अनेक घटनावरून आपण अनुभवले आहे. पुण्यात ३० एकर वनजमिनी प्रकरणात सरन्यायाधीश रामकृष्ण गवई यांनी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांना चांगलाच दणका दिला आहे. ही जमीन विकासकांच्या घश्यात घालणारे राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. सरन्यायाधीश गवई यांनी ही जमीन वनविभागाची असुन ती वनविभागाला परत देण्याचे आदेश दिले आहेत. २७ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूलमंत्री असताना वनविभागाची ३० एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पण नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंनी घेतलेला हा निर्णय काल…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आदित्य ठाकरे यांनी ठोकला विजयी षटकार ; राज ठाकरे क्लीनबोल्ड, गेल्या महिन्यात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राज यांनी ” आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो,” असे जाहीर वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर आपला राजकीय बाजार चांगलाच वधारला.राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व चर्चेला उधाण आले.उद्धव व राज,हे भाऊ लवकरच एकत्र येणार व राज्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे पाहायला मिळणार, असे अंदाज व्यक्त होऊ लागले.हे दोघे भाऊ परदेश दौऱ्यावरून परतले की या होऊ घातलेल्या युतीचा शुभारंभ होणार,अशी चर्चा महिनाभर सुरू होती.मात्र हे दोघे परत आल्यानंतर याविषयी फारशा हालचाली…

Read More

वसंत भोईर,वाडा गौरापूर गावाला वादळी वाऱ्याने झोडपले ; २४ घरांची पडझड, वाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे.काल सायंकाळी वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडल.यावेळी वा-याने गौरापूर गावाला अक्षरश झोडपून काढले.गाव व लोंढारे पाड्यातील सुमारे २४ घरांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांची छप्परे उडून गेली आहेत.नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पार भिजले आहे. पुंडलिक उल्हास, उल्हास मथे,दत्तात्रय जाधव, मनोज पडवळे,हरी मोर,भरत मोर,भगवान मोर,नारायण जाधव,भिवा मथे,भारती पडवळे,दशरथ धापशी,जानू वणगे,कल्पेश जाधव,मजुंळा तांडेळ,अनिल मथे,बारकू मथे, शैलेश मथे,नंदू शेळके,वंदना मथे,संतोष मथे,निलेश मथे असे नुकसान झालेल्या नागरिकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास प्रचंड वादळ वारा सुटला होता.त्यामुळे गावात हाहाकार…

Read More

नवीन पाटील,सफाळे खा.सवरा यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित… पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे पर्यायी व्यवस्था न करता ३१ मार्च २०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने अचानकपणे बंद केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ १३ मे पासून सफाळे विकास कृती समितीतर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते.आज खा.डॉ.हेमंत सवरा यांनी उपोषणस्थळी भेट देवून पर्यायी व्यवस्थेसंदर्भात काही आश्वासने दिल्यानंतर आंदोलकानी तात्पुरती स्थगिती दिली.मात्र दिलेल्या वेळेत मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल,असा इशाराही कृती समितीकडून देण्यात आला. सफाळे स्थानकाजवळ असलेले रेल्वे फाटक क्रमांक ४२ हे बंद होऊ…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानिवली,प्रा.आ. केंद्र गोऱ्हे,प्रा.आ.केंद्र परळी, प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. यंदा राष्ट्रीय डेंगू दिन ” तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंगूला हरविण्याचे उपाय करा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा. आ.केंद्र खानिवली अंतर्गत गावात डेंगू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या वेळी डेंगू,चिकनगुनिया,पाणी साठे स्वछता,साथ रोग व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली.तसेच कोरडा दिवस पाळण्या संदर्भात…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा पं.स.च्या तांत्रिक सहा.ला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले, वाडा पंचायत समिती रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहा.सुशील कटारे याला ५ लाखाचा निधी मंजूर करण्यासाठी ५ हजाराची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.या प्रकाराने पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहीरीकरिता ५ लाखांचा निधी मंजूर करण्यासाठी पंचायत समिती वाडा यांच्याकडे अर्ज केला होता.ही विहीर मंजूर करण्यासाठी तांत्रिक सहा.व वरिष्ठांसाठी १५ हजार रू.ची मागणी केली होती.तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार काल तक्रारदार यांना पंचासोबत पडताळणीसाठी पाठवले असता,स्वत:साठी ५ हजार व…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण भागात मान्सूनच्या तोंडावर घराची दुरुस्ती व डागडुजीला सुरुवात… नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील जनतेची पार दाणादाण उडवून दिली आहे.परवा रात्री झालेली अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात सुमारे शंभरहून अधिक घरांची पडझड झाली.या बाधित घरांची महसूल विभागाकडून सध्या पाहणी करण्यात येत असून या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला पाठवण्यात येणार आहे. मात्र अचानक कोसळलेल्या या संकटामुळे स्थानिक भूमिपुत्र मात्र कोलमडून पडला आहे.जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत असते.परंतु यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मे महिन्यातच अतिवृष्टीला सामोरे जावे लागले.अवकाळी पाऊस जर इतका धुवांधार पडतो तर यंदाचा पावसाळा हा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता गृहीत…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार बँकेचा ” सॅफ,” ला बाय बाय… दहा वर्षांपूर्वी अनियंत्रित कर्जांमुळे ( एन.पी.ए. ) आर्थिक अडचणीत सापडलेल्या जव्हार अर्बन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये ‘सॅफ’ ( सुपरवायजरी ॲक्शन फ्रेमवर्क ) अंतर्गत वर्गीकृत केले होते.त्यामुळे बँकेवर अनेक निर्बंध लादलण्यात आले होते.विद्यमान संचालक मंडळाने प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करून नवीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली.त्यांच्या या प्रयत्नांमुळे अल्पावधीत बँकेचा एन.पी.ए. ३६ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आले.त्यामुळे बँकेचा नफा वाढला व बँकेच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा झाली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने ‘अ’ श्रेणीचे ऑडिट रेटिंग प्राप्त केले.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळ आणि प्रशासनाने केवळ दोन वर्षांत केलेल्या या प्रभावी कामगिरीची दखल घेत,…

Read More

दीपक मोहिते, मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा… देशात मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा असून हे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एका अहवालातून समोर आले आहे.१ हजार मुलांमागे ८४३ मुली,असे हे प्रमाण असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.गेल्या पंचवीस वर्षात मुलीच्या जन्मदराने इतका नीचांक कधीच गाठला नव्हता.सदर बाब सामाजिक चिंता वाढवणारी आहे.या अशा स्थितीमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात,अशी विदारक परिस्थिती देशाच्या शहरी व ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.त्यामुळे याप्रश्नी प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्याची गरज आहे.तसेच या विषयी असलेले कायदे अधिक कडक व्हायला हवेत. केंद्र व राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजना राबवत असते,पण त्यास लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे.”…

Read More