वसंत भोईर,वाडा
वाड्यात राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम,
राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त आरोग्य विभागातर्फे तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानिवली,प्रा.आ. केंद्र गोऱ्हे,प्रा.आ.केंद्र परळी, प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यंदा राष्ट्रीय डेंगू दिन ” तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंगूला हरविण्याचे उपाय करा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा. आ.केंद्र खानिवली अंतर्गत गावात डेंगू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या वेळी डेंगू,चिकनगुनिया,पाणी साठे स्वछता,साथ रोग व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देण्यात आली.तसेच कोरडा दिवस पाळण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा.आ.केंद्र गोऱ्हेतर्फे गोऱ्हे गावात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आली.या वेळी घोषणा देत डासापासून होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.तसेच प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.प्रा.आ.केंद्र परळी अंतर्गत परळी गावात जनजागृती रॅली काढून डेंगू, मलेरिया,जलद ताप यासारखे साथीचे आजाराबद्दल गावात जनजागृती करण्यात आली. तसेच प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या वेळी तालुका हिवताप पर्यवेक्षक एस.एस.पाटील, तालुक्यातील चारीही प्रा.आ. केंद्रचे कर्मचारी,आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते.

