वसंत भोईर,वाडा
गौरापूर गावाला वादळी वाऱ्याने झोडपले ; २४ घरांची पडझड,
वाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे.काल सायंकाळी वादळ वा-यासह जोरदार पाऊस पडल.यावेळी वा-याने गौरापूर गावाला अक्षरश झोडपून काढले.गाव व लोंढारे पाड्यातील सुमारे २४ घरांचे प्रचंड नुकसान झाले असून घरांची छप्परे उडून गेली आहेत.नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पार भिजले आहे.
पुंडलिक उल्हास, उल्हास मथे,दत्तात्रय जाधव, मनोज पडवळे,हरी मोर,भरत मोर,भगवान मोर,नारायण जाधव,भिवा मथे,भारती पडवळे,दशरथ धापशी,जानू वणगे,कल्पेश जाधव,मजुंळा तांडेळ,अनिल मथे,बारकू मथे, शैलेश मथे,नंदू शेळके,वंदना मथे,संतोष मथे,निलेश मथे असे नुकसान झालेल्या नागरिकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास प्रचंड वादळ वारा सुटला होता.त्यामुळे गावात हाहाकार उडाला.दरम्यान,तलाठी,मंडळ अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
यासंदर्भात वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.तसेच गरजूंना सामाजिक संस्थेतर्फे अन्न धान्य पुरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वादळ वा-याने आमची घरे उध्वस्त झाली असून आम्हाला सरकारने तातडीने मदत करावी,अशी मागणी बाधित ग्रामस्थानी केली आहे.

