जव्हार प्रतिनिधी,
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर – आ.हरिश्चंद्र भोये,
जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा,हे डोंगरी व आदिवासीबहुल तालुके असून, येथे प्रामुख्याने हंगामी शेती केली जाते.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जव्हार येथे नुकतीच खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत आ.हरिश्चंद्र भोये यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकल्या व विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना आ. भोये, आपल्या भाषणात म्हणाले, ” शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.कृषी विभागातील अधिकारी,कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांना मार्गदर्शन करावे.मधमाशी पालन,फळबाग,फुलबाग लागवडीसाठी सहकार्य करावे. गरीब शेतकऱ्यांसाठी वॉल कंपाऊंडसारख्या सुविधांची मागणी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे करावी.पुढे ते म्हणाले, ” पीक विमा योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही, यासाठी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावून आवश्यक त्या सूचना करा. शेतकऱ्यांना वेळेवर खते व बियाणे उपलब्ध करून द्या, काही दुकानदार मुद्दाम खतांचा तुटवडा निर्माण करतात,त्याकडे लक्ष द्या. तसेच संशोधित शेतीपद्धती, अभ्यास दौरे व शेतकरी प्रशिक्षणाद्वारे शेती उत्पादनात वाढ करणे,हा माझा उद्देश आहे.” शेतीसाठी पाणी अडवा,पाणी जिरवा,योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी असल्यास त्यासाठी मदत करण्याची माझी तयारी आहे. या भागात शेतीशिवाय दुसरा कोणताही उद्योग,रोजगार नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे, अत्यंत गरजेचे आहे.” शेतकरी महा डीबीटी पोर्टल,” च्या माध्यमातून थेट लाभ मिळवून द्यावेत.रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे विशेष लक्ष द्यावे.” यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सोमनाथ गावडे,तसेच जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

