- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
अनंत भोईर,पालघर पालघर येथे ” पोषण पखवाडा २०२५,” चा सांगता समारंभ उत्साहात संपन्न, “ सुपोषित बालक – तेजस्वी भारत,” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राबवण्यात आलेल्या “पोषण पखवाडा २०२५,” या जनजागृती मोहिमेचा तालुका स्तरीय सांगता कार्यक्रम आज पालघर येथे भव्य उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रवीण मधुकर भावसार ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व प्रकल्प अधिकारी,पालघर नागरी ) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख सेविका भोये,पालघर बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका,स्थानीय पालक वर्ग, तसेच बालके सहभागी झाले होते. ८ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान पालघर तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये पोषणविषयक…
सुरेश वैद्य,पालघर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत आज सायंकाळी शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व जनजागृती करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) ऐजाज शेख,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रशेखर जगताप,महिला व बालकल्याण अधिकारी प्रवीण भावसार,स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी, वित्त व लेखा अधिकारी धनराज पांडे,कृषी अधिकारी पिंजारी,जिल्हा…
प्रतिनिधी जव्हार, आदिवासी तरुण डॉ.अजय डोके यांचा युपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील दुर्गम कोगदा गावात राहणाऱ्या डॉ. अजय कांशीराम डोके या २७ वर्षीय युवकाने UPSC २०२४ परीक्षेत अव्वल नंबर पटकावत संपूर्ण जव्हार तालुक्याचा व पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.ते जव्हार तालुक्यातील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले आदिवासी तरुण ठरले आहेत. डॉ.अजय डोके यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले असून,त्यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी कोगदा गावातच झाले.त्यानंतर त्यांनी ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण इंग्लिश मिडीयम स्कुल ब्रम्हावॅली,त्र्यंबकेश्वर येथे पूर्ण केले.अभ्यासातील सातत्य व चिकाटीमुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही यश मिळवले. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईतील…
दीपक मोहिते, मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा ; राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय,एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.गेल्या अनेक दशकापासून मच्छीमार मागणी करत होते,ती आता पूर्ण झाली असून याचा लाभ राज्यातील सुमारे ४ लाख ८३ हजार मच्छीमाराना होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मच्छीमाराना आता कृषिक्षेत्राप्रमाणे विविध सवलती मिळणार आहेत.त्यामध्ये विमा, आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई याचा समावेश आहे.या सवलतीमुळे मत्स्यव्यवसायला सुगीचे दिवस येतील व उत्पादन वाढीस चालना मिळेल.तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील बळकटी येणार आहे.या निर्णयामुळे मच्छीमाराना वीज शुल्कात अनुदान मिळेल,त्यांना किसान क्रेडिट कार्ड,कृषी दराने कर्ज,अल्पदराने विमा संरक्षणाचा लाभ,उपकरणे सवलतीच्या दराने उपलब्ध होतील.यापूर्वी मत्स्य…
दीपक मोहिते, बॉटम लाईन, पहलगाम दहशतवादी हल्ला ; २७ पर्यटक मृत्यूमुखी, पहलगामचा दहशतवादी हल्ला,हा जम्मू-काश्मीर अद्याप धगधगतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने नेमकं काय घडलं,ते सविस्तर सांगितले असुन या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत.तर अन्य बारा जण जख्मी झाले आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री तातडीने जम्मु – काश्मीरला रवाना झाले आहेत.तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन चर्चा केली. जम्मू-काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.यात काही महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला ? याविषयी तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने सविस्तरपणे सांगितलं आहे.जम्मू-काश्मीरमधील या हल्ल्यानंतर…
सुरेश गिरंधले,मोखाडा मोखाडा भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद झोले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन खोडाळा गटातील भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष मिलिंद झोले यांची निवड करण्यात आली आहे. मोखाडा येथील भाजपच्या कार्यालयात महिला जिल्हा सरचिटणीस तथा भाजप निवडणूक अधिकारी ज्योती भोये यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीतून निवडण्यात आलेल्या मोखाडा मंडळातील अध्यक्षपदाची धुरा तरुण कार्यकर्त्याकडे सोपवण्यात आल्यामुळे मंडळात उत्साहाचे वातावरण आहे.मिलिंद झोले यांनी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये खोडाळा गटात मोठे परिश्रम घेऊन भाजपला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत त्यांना सर्वसमंतीने तालुका अध्यक्षपद मिळाले. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर…
वसंत भोईर,वाडा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काँग्रेस घेणार आक्रमक पवित्रा – विक्रांत चव्हाण, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर आगामी काळात पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर लढा उभारेल असे प्रतिपादन काँग्रेसचे पालघर जिल्हा निरीक्षक अँड विक्रांत चव्हाण वडा येथील आढावा बैठकीत केले.काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वाड्यातील गांधरे येथील स्नेह गार्डन येथे आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना,चव्हाण म्हणाले,काही वर्षांपूर्वी पालघर जिल्हात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते.परंतु २०१४ च्या सत्ता बदलानंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या दुर्बल बनला आहे.हे वास्तव स्विकारून आगामी काळात या जिल्हात काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी…
सुरेश काटे,तलासरी जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ तलासरीत मोर्चा, जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ तलासरी तहसील कार्यालयावर विविध संघटनानी आज सकाळी मोर्चा काढला.या मोर्चात विविध संघटनेचे सहा हजाराहून कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज निघालेल्या या मोर्चात माकपच्या कार्यकर्त्यांसह, जनवादि महिला संघटनेचे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनसुरक्षा विधेयक रद्द करा, घरकुलाचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, तालुक्यातील राखडलेली विकासाची कामे त्वरित पूर्ण करा,जलजीवन मिशनचे काम लवकर पूर्ण करा,विजेचे स्मार्ट मीटर योजना रद्द करा,एक्सप्रेस हायवे वरील गावातील ब्रिज झालेच पाहिजेत,वनदावे मंजूर करा, बुलेट ट्रेन,पॉवर ग्रीड मधील बाधित शेतकऱ्यांना योग्य व त्वरित मोबदल्याचे वाटप करा, इ मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील बँका व…
वसंत भोईर,वाडा टायर कंपन्यांच्या परवानग्या देताना पेसा कायद्याला हरताळ, वाडा तालुका हा अनुसूचित क्षेत्रात येत असून या भागाला पेसा कायदा लागू आहे.या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रात कोणताही कारखाना उभारण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असते.पेसा कायद्यान्वये बंधनकारक असताना वाडा तालुक्यातील वडवली येथे टायर कंपन्यांना परवानगी देताना ग्रामसभेची मंजुरी न घेता संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ना हरकत दाखले दिले आहेत.त्यामुळे या सदस्यांनी पेसा कायद्याला हरताळ फासला आहे. वाडा तालुक्यात टायर कंपन्यांचे पेव सुटले असून सुमारे ७०हून अधिक प्रदूषण कारी टायर कंपन्या उभारण्यात आल्या आहेत.या कंपन्या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.यातील ५२ टायर कंपन्या दिवस-रात्र प्रदूषणकारी धूर ओकत असुन त्यांच्या…
” गावच्या दारी ग्रामपंचायत,”योजनेतर्गत कासटवाडीत लोकाभिमुख उपक्रम, सरपंच कल्पेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली “ग्रामपंचायत आपल्या दारी,सर्वेक्षण आपल्या घर,”‘ उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून ” ग्रामपंचायत आपल्या दारी – सर्वेक्षण आपल्या घरी,” हा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. बहुतेक ठिकाणी ग्रामपंचायत प्रतिनिधी कार्यालयात, न भेटणं अशी नेहमीची तक्रार असते.मात्र कासटवाडी ग्रामपंचायतीने त्या चौकटीला छेद देत संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व सदस्य यांनी गावोगाव जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमांतर्गत मंजूर घरकुल योजना,विकासकामे, प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण टप्पा २…
