वसंत भोईर,वाडा
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काँग्रेस घेणार आक्रमक पवित्रा – विक्रांत चव्हाण,
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नावर आगामी काळात पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर लढा उभारेल असे प्रतिपादन काँग्रेसचे पालघर जिल्हा निरीक्षक अँड विक्रांत चव्हाण वडा येथील आढावा बैठकीत केले.काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वाड्यातील गांधरे येथील स्नेह गार्डन येथे आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना,चव्हाण म्हणाले,काही वर्षांपूर्वी पालघर जिल्हात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते.परंतु २०१४ च्या सत्ता बदलानंतर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या दुर्बल बनला आहे.हे वास्तव स्विकारून आगामी काळात या जिल्हात काँग्रेस पक्षाला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढा उभारण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावा लागणार आहे.धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला पर्याय म्हणून काँग्रेसच्या सर्व समावेशक राजकारणाचा विचार लोकांपर्यंत घेऊन जात या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभारणीचे काम करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी जरी असली तरी अधिक जागा काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची आवश्यकता असल्याचे ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील,काँग्रेसच्या सहकार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष निलेश भोईर, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,काँग्रेस नेत्या संगीता धोंडे,नगरसेवक भारती सपाटे, विशाखा पाटील,शहराध्यक्ष राजू पातकर,मुदस्सर पटेल, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश बाराठा, महिला तालुकाध्यक्ष साक्षी आगिवले,संदीप सिंगडा, अंदान धांगे,सिकंदर शेख, मनोज पाटील,गिरीश पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

