सुरेश काटे,तलासरी
जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ तलासरीत मोर्चा,
जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ तलासरी तहसील कार्यालयावर विविध संघटनानी आज सकाळी मोर्चा काढला.या मोर्चात विविध संघटनेचे सहा हजाराहून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आज निघालेल्या या मोर्चात माकपच्या कार्यकर्त्यांसह, जनवादि महिला संघटनेचे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जनसुरक्षा विधेयक रद्द करा, घरकुलाचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा, तालुक्यातील राखडलेली विकासाची कामे त्वरित पूर्ण करा,जलजीवन मिशनचे काम लवकर पूर्ण करा,विजेचे स्मार्ट मीटर योजना रद्द करा,एक्सप्रेस हायवे वरील गावातील ब्रिज झालेच पाहिजेत,वनदावे मंजूर करा, बुलेट ट्रेन,पॉवर ग्रीड मधील बाधित शेतकऱ्यांना योग्य व त्वरित मोबदल्याचे वाटप करा, इ मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील बँका व पोस्ट कार्यालयात होणारी प्रचंड गर्दी व नागरिकांना होणारा त्रास यावर उपायोजना करा, अशी मागणी मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व संघटनानी केली.
या मोर्चाचे नेतृत्व माकपचे तालुका सेक्रेटरी लक्ष्मण डोंबरे,डीवायएफआयचे नंदकुमार हाडल,सुरेश भोये, विजय बोदले,संतोष खटाले, राजेश खरपडे,अनिल झिरवा, अक्षय दवणेकर,राघू चिमडा, रशीला धोडी,दर्शना बोदले, सविता डावरे,उर्मिला शिंगडे, सुभाष दुमाडा,विलास ठाकरे, सुहास सुरती,शंकर खेवरा, जिग्नेश मोर यांनी केले.

