दीपक मोहिते,
बॉटम लाईन,
पहलगाम दहशतवादी हल्ला ; २७ पर्यटक मृत्यूमुखी,
पहलगामचा दहशतवादी हल्ला,हा जम्मू-काश्मीर अद्याप धगधगतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने नेमकं काय घडलं,ते सविस्तर सांगितले असुन या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत.तर अन्य बारा जण जख्मी झाले आहेत.हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री तातडीने जम्मु – काश्मीरला रवाना झाले आहेत.तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन चर्चा केली.
जम्मू-काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.यात काही महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश आहे.
पहलगामचा दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला ? याविषयी तेथे गेलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकाने सविस्तरपणे सांगितलं आहे.जम्मू-काश्मीरमधील या हल्ल्यानंतर पहलगामला छावणीचे स्वरुप आले आहे. सर्वत्र भारतीय सैनिक दिसत आहेत.
आईस लेनचा आनंद घेण्यासाठी जातात पर्यटक
पहलगाममध्ये महाराष्ट्राचे हरिष सोलिया या पर्यटकाने माध्यमाशी संवाद साधला. दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला ? याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. “ पहलगाममध्ये आईस लेन आहे.या आईस लेनचा आनंद घेण्यासाठी त्या भागात पर्यटक जात असतात.आम्ही देखील त्याच ठिकाणी होतो. माझ्यासोबत चार ते पाच ज्येष्ठ नागरिक होते.त्यामुळे मी खालीच होतो,वर गेलो नाही. वरच्या भागात गोळीबार झाला आहे,” अशी माहिती मिळाली व सर्वत्र भितीचे वातावरण पसरले.
ही घटना घडल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ,आर्मीची वाहने परिसरात दाखल झाली. चंदनवाडी ते पहलगाम हा ३० कि.मी.चा रस्ता आहे,याच रस्त्यावरून आम्ही आलो होतो.या हल्ल्यानंतर रस्त्यावरची सर्व दुकाने बंद झाली आहेत.जेव्हा गोळीबार झाला तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका दिसत होत्या.पोलीसांचाही ताफा दिसत होता,असेही त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक फिरायला गेले होते.या हल्ल्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला आहे.तर जखमींमध्ये महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा समावेश आहे. जखमींमधील ४ पैकी २ जण पुण्यातील आहेत.माणिक पाटील,एस.भालचंद्र यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
दरम्यान,या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.तसेच या हल्ल्याचा निषेध केला आहे. दुसरीकडे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे थेट जम्मू काश्मीरमध्ये तातडीने पोहोचले.
या घटनेनंतर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असुन या घटनेतील दोषींना सोडणार नाही,असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर सुरक्षा पथकांनी परिसराला घेराव घातला असुन कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान जगभरातील देशांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

