अनंत भोईर,पालघर
पालघर येथे ” पोषण पखवाडा २०२५,” चा सांगता समारंभ उत्साहात संपन्न,
“ सुपोषित बालक – तेजस्वी भारत,” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राबवण्यात आलेल्या “पोषण पखवाडा २०२५,” या जनजागृती मोहिमेचा तालुका स्तरीय सांगता कार्यक्रम आज पालघर येथे भव्य उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रवीण मधुकर भावसार ( जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व प्रकल्प अधिकारी,पालघर नागरी ) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख सेविका भोये,पालघर बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका,स्थानीय पालक वर्ग, तसेच बालके सहभागी झाले होते.
८ ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान पालघर तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये पोषणविषयक उपक्रमांची मालिका राबवण्यात आली. यामध्ये “ पहिल्या १ हजार दिवसांचे महत्त्व,” पोषण ट्रॅकरद्वारे लाभार्थ्यांची डिजिटल नोंदणी, कुपोषणमुक्तीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन,अति लठ्ठपणावर प्रतिबंधात्मक उपाय यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमांतून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण,पालकांचे पोषणविषयक प्रबोधन,तसेच अंगणवाडी सेविकांचे कार्य कौशल्य समाजासमोर प्रभावीपणे आले.शिस्तबद्ध आयोजन,संपूर्ण समुदायाचा सहभाग आणि सेविकांचे महत्वपूर्ण योगदान,यामुळे हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला.

