Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, राज्यभाजपच्या कार्य.अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व पालघर/सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.काल शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय नेत्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.येत्या दोन महिन्यात संघटनात्मक निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.तोवर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत राहतील. चव्हाण यांची राजकीय वाटचाल कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक ते प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अशी झाली आहॆ.ते २००५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले,२००७ साली स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली.त्यानंतर २००९ साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.त्यानंतर त्यांनी २०१४,२०१९ व २०२४ या…

Read More

दीपक मोहिते, पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहॆ ,ते पुन्हा माघारी फिरणे शक्य नाही, आम्ही राज्यातील महाविकास आघाडी व राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीला लवकरच टाळे लागेल,असे भाकीत केले होते.ते आता खरे ठरू पाहत आहे.सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले आहेत.त्यांच्या या बदलत्या भूमिकेविषयी कोणालाही आश्चर्य वाटले नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जे अपयश पक्षाच्या पदरात पडले,तेव्हांपासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.या पराभवाने पक्षांतर्गत वादही उफाळून वर आले आहेत.मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत ते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार राजन साळवी या दोघांमध्ये झालेली खडाजंगी पक्षाला क्षती पोहोचवणारी ठरली आहे.बैठकीत…

Read More

संदीप जाधव,बोईसर, दिपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५ जाहीर, पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार व ” news27.in media,” या नावाजलेल्या वेबपोर्टलचे मुख्य संपादक दीपक मोहिते यांना, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,नाशिक ( रजि.) तर्फे पत्रकार दिनी राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचा वितरण सोहळा ५ जाने.रोजी नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.पण मोहिते यांच्या बहिणीचे अकाली निधन झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांना स्विकारता आला नाही.संस्थेने तो पुरस्कार त्यांना पाठवून दिला आहे. दीपक मोहिते यांनी गेल्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत गावकरी,लोकमत,पुढारी, प्रहार व सागर,या प्रमुख दैनिकात विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे.या काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.त्यामध्ये…

Read More

अमर राऊत,चिंचणी, चिंचणी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न, काल जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प डहाणूच्या वतीने महिला व मुलींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायत सभागृह,चिंचणी येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला चिंचणी ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा शिंगडे आणि उपसरपंच आशा वर्तक इ.मान्यवर उपस्थिती होते. ऍड.राकेश मडवे यांनी शिबिराला महिलांना विविध कायद्यांची सखोल माहिती दिली.त्यांनी महिलांचे हक्क व कायदे,हुंडाबंदी कायदा, स्त्रीधन व मालमत्ता अधिकार, वारसा हक्क,विवाह कायदा, घटस्फोट,पोटगी, बलात्कारविषयक कायदे तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यांवर मार्गदर्शन केले. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याविषयीचे ज्ञान वाढवणे,हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.उपस्थित महिलांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. कायद्याविषयीचे अनेक शंकाचे…

Read More

वसंत भोईर,वाडा, बि-हाड  आंदोलन  दुस -या दिवशीही सुरूच… वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दगडखदान मालकांकडून सतत होत असलेल्या बोअर ब्लास्टिंग मुळे या गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडा जाऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या संदर्भात महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.त्यामुळे कालपासून धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.मात्र या मोर्चाची साधी दखलही न घेतल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. डोंगस्ते गावालगत असलेल्या मे.सी.स्क्वेअर कं.लि.( कॅप्टन इन्फ्रा लि.), मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस या दगडखदान व्यवसायिकांकडून दिवस-रात्र बोअर ब्लास्टिंग केली जात आहॆ.त्यामुळे गावातील अनेक गोर-गरीब शेतकरी,शेतमजुरांच्या घरांच्या भिंतीना तडे जाऊन घरांचे…

Read More

दीपक मोहिते, उद्या शिर्डी येथे भाजपचे एकदिवसीय अधिवेशन,नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहॆ.उद्या अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे भाजपचे भव्य अधिवेशन होत आहॆ. या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे तमाम मंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री,केंद्रातील मंत्री,खासदार,आमदार, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष असे १५ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत आहे.नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती,या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहॆ. या अधिवेशनात आज सकाळी पक्षाच्या कोअर…

Read More

सुनील किणी,नालासोपारा कळंब समुद्रकिनारी विद्यार्थ्यांनी साकारली वाळूशिल्पे, नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्रकिनारी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वाळूशिल्प साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.वसई विकसिनी दृक्‌-‍कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या राज्यस्तरीय वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वसईतील आणि मुंबई परिसरातील विविध कला महाविद्यायातील २४० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.वरिष्ठ गटात एकूण ८ गटातून ४० स्पर्धक तर कनिष्ठ गटात एकूण ४० गटातून २०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.वरिष्ठ गटात वसई विकासिनी दृक्‌-‍कला महाविद्यालयाने प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकावला तर वडाळ्याच्या जे.के.अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन महाविद्यालयाने तृतीय क्रमांक…

Read More

सुनील पाटील,नायगाव, बहुजन विकास आघाडी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश….. भाजपा पक्षाच्या नेतृत्वावर, विचारसरणीवर व कार्यशैलीवर विश्वास ठेऊन खा.डॉ.हेमंत सवरा,वसई विधानसभा आ.स्नेहाताई दुबे पंडित,सरचिटणीस श्री.अभय कक्कड यांच्या उपस्थितीत जिल्हा सचिव प्रवीण गावडे यांच्या प्रयत्नातून बहुजन विकास आघाडी नायगावचे अध्यक्ष धरेंद्र कुळकर्णी,उपाध्यक्ष कॅरलिन अलमेडा व त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,राजू म्हात्रे,उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे,निशिकांत म्हात्रे,धर्मेद्र मिश्रा,कैलास म्हात्रे,वृदांवन सोसायटीचे चेअरमन जयेश म्हात्रे,प्रमोद तिवारी,ललित म्हात्रे,भरत पाटील,विवेक भोस्कर, काशिनाथ बागुल,प्रदीप पाटील,मेघनाद पाटील,गितेश सुर्वे व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

दीपक मोहिते, माणुसकीला काळिमा, मुला पाठोपाठ बापाने देखील गळफास घेतला, नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाने कपडे,वह्या व पुस्तके न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.हा धक्का सहन झाल्यामुळे त्याच्या वडिलांनीही त्याच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली. बिलोली तालुक्यात मिनकी या गावात ही दुर्देवी घटना घडली असून संपूर्ण जिल्हा या घटनेने हळहळत आहे.हा मुलगा उदगीर येथे दहावीत शिकत होता,शाळांना सुट्ट्या असल्यामुळे तो आपल्या घरी आला होता.परत जाण्यापूर्वी त्याने कपडे,पुस्तके व वह्या घेण्यासाठी आपल्या वडिलांकडे हट्ट धरला होता.पण वडिलांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला दोन दिवस थांबायला सांगितले,पण मी आजच उदगीरला जाणार आहे,त्यामुळे मला आजच द्या,असा हट्ट धरला.पण वडील त्याची…

Read More

दीपक मोहिते, निव्वळ धूळफेक, ड्रोनद्वारे समुद्रावर ” जागते रहो,” ; कितपत यशस्वी होणार ? राज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मासेमारी बोटीतर्फे करण्यात येत असलेल्या अवैध मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचा संबधित विभाग विविध उपाययोजना करत असते.आता अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यासाठी समुद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.पण ही यंत्रणा कितपत यशस्वी ठरेल,याविषयी मच्छीमार साशंक आहेत. राज्याला सुमारे मुंबई ते थेट गोव्यापर्यंत सुमारे ७२० कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.या समुद्रात गेल्या काही वर्षांपासून ट्रॉलरनेटच्या साहाय्याने,पर्ससीन,गिल नेट,एलईडी,डायनामाईट व रसायने वापरून अवैध रित्या मासेमारी करणाऱ्या प्रकारांना उत आला आहे.शेजारच्या गुजरात राज्यातील अनेक मासेमारी बोटी,सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत घुसखोरी करतात व मत्स्यउत्पादन पळवून नेतात.तसेच…

Read More