वसंत भोईर,वाडा,
बि-हाड आंदोलन दुस -या दिवशीही सुरूच…
वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दगडखदान मालकांकडून सतत होत असलेल्या बोअर ब्लास्टिंग मुळे या गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडा जाऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या संदर्भात महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.त्यामुळे कालपासून धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.मात्र या मोर्चाची साधी दखलही न घेतल्याने ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
डोंगस्ते गावालगत असलेल्या मे.सी.स्क्वेअर कं.लि.( कॅप्टन इन्फ्रा लि.), मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस या दगडखदान व्यवसायिकांकडून दिवस-रात्र बोअर ब्लास्टिंग केली जात आहॆ.त्यामुळे गावातील अनेक गोर-गरीब शेतकरी,शेतमजुरांच्या घरांच्या भिंतीना तडे जाऊन घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.शिवाय येथील नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.या नुकसानीची चौकशी करून नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच पिढ्यान पिढ्या जंगलात शेती करणा-या आदिवासी बांधवांची अडवली जाणारी वाट मोकळी करून द्यावी.या मागण्यांसाठी वारंवार प्रशासनाकडे अर्ज,विनंत्या, हेलपाटे मारूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून या गावातील ग्रामस्थांनी काल तहसीलदार कार्यालयावर बि-हाड मोर्चा काढला होता.या मोर्चाचीही प्रशासनाने दखल न.घेतल्याने आंदोलन दुस-या दिवशीही सुरूच आहे.
महसूल प्रशासनाने आंदोलनाची साधी दखलही न घेतल्याने दुस-या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी कालपासून अन्नत्याग केल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे आंदोलन चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.आंदोलनात ४० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
यातील मालती न्हाणवे ( वय-८० ) रूखमाय मोरणा ( वय-८२ ) या दोन वयोवृद्ध महिला आणि विराध्या अक्षय पवार ( वय-दहा महिने )या लहान मूलीची प्रकृती खालावल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहॆ.

