संदीप जाधव,बोईसर,
दिपक मोहिते याना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार – २०२५ जाहीर,
पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार व ” news27.in media,” या नावाजलेल्या वेबपोर्टलचे मुख्य संपादक दीपक मोहिते यांना, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार
संघ,नाशिक ( रजि.) तर्फे पत्रकार दिनी राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचा वितरण सोहळा ५ जाने.रोजी नाशिक येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.पण मोहिते यांच्या बहिणीचे अकाली निधन झाल्यामुळे हा पुरस्कार त्यांना स्विकारता आला नाही.संस्थेने तो पुरस्कार त्यांना पाठवून दिला आहे.
दीपक मोहिते यांनी गेल्या तीस वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीत गावकरी,लोकमत,पुढारी,
प्रहार व सागर,या प्रमुख दैनिकात विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे.या काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.त्यामध्ये स.गो.वर्टी,विजयानंद पाटील,लोकमान्य टिळक,राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण व अन्य नावाजलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे.राजकीय, सामाजिक,शैक्षणिक व ग्रामीण अर्थव्यवस्था इ.ज्वलंत विषयावर त्यांनी विपुल लेखन केले.ग्रामीण भागाच्या विकासावर त्यांनी सलग २१ वर्षे ” सूर्यातीर,” हे साप्ताहिक सदर चालवले.तसेच या सर्व लेखसंग्रहाचे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.लवकरच हा पुरस्कार ते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते स्विकारणार आहेत.

