सुनील पाटील,नायगाव,
बहुजन विकास आघाडी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…..
भाजपा पक्षाच्या नेतृत्वावर, विचारसरणीवर व कार्यशैलीवर विश्वास ठेऊन खा.डॉ.हेमंत सवरा,वसई विधानसभा आ.स्नेहाताई दुबे पंडित,सरचिटणीस श्री.अभय कक्कड यांच्या उपस्थितीत जिल्हा सचिव प्रवीण गावडे यांच्या प्रयत्नातून बहुजन विकास आघाडी नायगावचे अध्यक्ष धरेंद्र कुळकर्णी,उपाध्यक्ष कॅरलिन अलमेडा व त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,राजू म्हात्रे,उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे,निशिकांत म्हात्रे,धर्मेद्र मिश्रा,कैलास म्हात्रे,वृदांवन सोसायटीचे चेअरमन जयेश म्हात्रे,प्रमोद तिवारी,ललित म्हात्रे,भरत पाटील,विवेक भोस्कर, काशिनाथ बागुल,प्रदीप पाटील,मेघनाद पाटील,गितेश सुर्वे व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

