अमर राऊत,चिंचणी,
चिंचणी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न,
काल जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प डहाणूच्या वतीने महिला व मुलींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायत सभागृह,चिंचणी येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला चिंचणी ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघा शिंगडे आणि उपसरपंच आशा वर्तक इ.मान्यवर उपस्थिती होते.
ऍड.राकेश मडवे यांनी शिबिराला महिलांना विविध कायद्यांची सखोल माहिती दिली.त्यांनी महिलांचे हक्क व कायदे,हुंडाबंदी कायदा, स्त्रीधन व मालमत्ता अधिकार, वारसा हक्क,विवाह कायदा, घटस्फोट,पोटगी, बलात्कारविषयक कायदे तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यांवर मार्गदर्शन केले.
महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कायद्याविषयीचे ज्ञान वाढवणे,हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.उपस्थित महिलांनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. कायद्याविषयीचे अनेक शंकाचे निरसन देखील ऍड.मडवे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले होते.ज्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याचा विश्वास महिला व बालविभागातर्फे व्यक्त करण्यात आला.

