Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी जव्हार येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न, तालुका कृषी विभाग व ग्रामपंचायत सारसून यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या मेळाव्यात शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडीवर विशेष भर देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड मतदार संघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना पाणी साठवण व सिंचन योजनेच्या माध्यमातून शासनाकडून पुरवले जाणारे लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच सारसून ग्रामपंचायत आदर्श गाव म्हणून सलग पाच वर्षे शासनाच्या विविध योजना राबवण्याचे घोषित केले. भाजीपाला आणि फळपिके यांची व्यवस्थित ग्रेडिंग व पॅकिंग करून विक्रीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा सल्ला…

Read More

दीपक मोहिते, कार्यकर्त्यांनो मरगळ झटकून कामाला लागा- माजी आ.हितेंद्र ठाकूर, काल नालासोपारा पूर्व आणि पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची बैठक माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विवा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.या बैठकीला सुमारे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या आवेशपूर्ण भाषणाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. यावेळी मार्गदर्शनपर केलेल्या आपल्या जोशपूर्ण भाषणात ठाकूर म्हणाले,या निवडणुकीतील पराभवाने आपण खूप काही शिकलो.आपल्याकडून चुका झाल्याचे मान्य करून त्यांनी आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे,असे सांगून आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.या निवडणुका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच आहेत.त्यासाठी मरगळ झटकून कामाला लागा.झालेल्या पराभवाची खंत जरूर आहे,पण आम्ही हिंमत हरलो नाही,आजही आम्ही कार्यालयात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकतो,अधिकाऱ्यांना…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावे की ” शरद पवार यांचे कृषीक्षेत्रात योगदान किती  ?, ” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना कायम ” जळी स्थळी शरद पवार,” दिसत असतात.पवार यांचा अमित शहा याना एवढा धसका का वाटतो,कळेनासे झाले आहे.यापूर्वीही शहा यांनी एका जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते.त्यावर पलटवार करताना पवार यांनी ” तडीपार,” अशा भाषेत संभावना करत,त्यांचे तोंड गप्प केले होते.काल त्यांनी पवार यांच्यावर टीका केली,पण ती सौम्य भाषेत होती.त्यांच्या या टीकेला पवार काय उत्तर देतात,हे लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल अमित शहा यांनी पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना,देशाचे…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” आगामी महानगरपालिका निवडणूक ; माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसली… काल शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.येत्या तीन ते चार महिन्यात या निवडणुका होतील,असा अंदाज व्यक्त करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष अद्याप सावरलेला नाही.भाजपच्या तयारीच्या तुलनेत विरोधी पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.पण माजी आ.हितेंद्र ठाकूर मात्र त्यास अपवाद ठरले आहेत.या निवडणुका लवकरच होतील,हे गृहीत धरून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका व मेळावे घेण्यास सुरुवात केली आहॆ.त्यांच्या या प्रयत्नाला कार्यकर्त्यांचा…

Read More

संजय लांडगे,वाडा, डोंगस्तेच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते हद्दीमध्ये दगडखदान,क्रशर व्यवसाय सुरू असून,सदर व्यवसायिकांकडून सातत्याने दिवसरात्र बोअर ब्लास्टींग करण्यात येत असते.त्यामुळे येथील घरांच्या भिंतींना तडे जावुन घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी धर्मवीर विचार मंचच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.पण प्रशासनाने याची दाखल घेतली नाही म्हणून दोन दिवसापूर्वी धर्मवीर विचार मंच व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला होता,पण त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवले होते.दरम्यान अध्यक्ष मिलिंद पष्टे यानी सलग तीन दिवस अन्नत्यागही केला. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून…

Read More

नदीम शेख,पालघर, चिंचणी बारीवाडा येथील पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना, चिंचणी – बारीवाडा येथील पाणीप्रश्न गंभीर बनल्यामुळे आ.गावित यांनी गावकऱ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहुन चर्चा केली. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आ.गावित यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाणीपुरवठा यंत्रणेतील अडचणी,नळजोडण्यातील त्रुटी आणि जलवाहिन्याच्या दुरुस्तीची आवश्यकता याबाबत अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला. गावकऱ्यांना जलस्रोत लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी अधिकारी व स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले.याविषयी आ.राजेंद्र गावित म्हणाले,पाणी हा मूलभूत हक्क असून, प्रत्येकाला तो मिळायला हवा. या समस्येचा त्वरित तोडगा काढण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल.प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना त्यांनी कडक सूचना दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी…

Read More

केदार पाटील, केळवे रोड, केळवे येथे महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व बालआनंद मेळावा संपन्न, केळवा ग्रामपंचायत क्षेत्रात आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी प्रशिक्षण, बालविकास,सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा समावेश होता.या उपक्रमांनी महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.या शिबिरामध्ये विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजया गोस्वामी मॅडम यांनी महिलांच्या हक्क, सायबर क्राईम,आणि मोबाईलवरील फसवणूक मेसेजेसबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य वैशाली करबट मॅडम यांनी अंगणवाडीच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे,तसेच बालकांच्या पोषण व विकासासाठी प्रयत्न करावेत, यावर भर दिला. बालकल्याण समिती सदस्य शुभांगी मॅडम यांनी बाल संगोपन,पोक्सो कायदा आणि महिला बालविकास योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन…

Read More

सुनील तायडे, विरार-कारगिलनगर येथे महिला मेळावा संपन्न, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता भेरे यांनी काल कारगिलनगर टेपाचा पाडा येथे शेतीच्या शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यास परिसरातील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते. सहभागी महिलांनी सर्व खेळात सहभागी होऊन आनंद लुटला.या मेळाव्यात अनेक महिलांनी आपल्या भाषणात माजी आ.हितेंद्र ठाकूर व माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या मेळाव्याला दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.या सर्व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला मंडळ,एकता महिला मंडळ,तनिष्क व्यासपीठ महिला मंडळ,कुणबी महिला मंडळ,जयदुर्गा महिला मंडळ…

Read More

वसंत भोईर,वाडा, १३ जाने. रोजी श्रमजीवी संघटना,कोका कोला कंपनीला देणार धडक, तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोकाकोला कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदी किना-यावर असलेल्या अनेक गावांना मार्च महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असताना कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहॆ.मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने श्रमजीवी संघटना येत्या १३ जाने.रोजी कोकाकोला कंपनीवर धडक देणार आहॆ. यासंदर्भात संघटनेने प्रशासनाला इशारेवजा निवेदन दिले आहॆ. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.पण शेतीसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने पावसाळी पाणी समुद्रात वाहून जाते.गांध्रे गावानजीक वैतरणा नदीवर कोल्हापूरी टाईपचा बंधारा बांधला आहे.१९७७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याची साठवण क्षमता २ दशलक्ष घ.मी.इतकी…

Read More

संजय लांडगे,वाडा, अंगणवाडीला बायोगॅस प्लांट, जिल्ह्यात पहिलाच उपक्रम, खानिवली ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात वाडा तालुक्यात अग्रेसर असुन वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबवण्यात येत असतात.गावाचा शास्वत विकास करायचा असेल तर अनेक नैसर्गिक संसाधनाचा वापर होणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण v संवर्धन करण्यावर ग्रामपंचायत नेहमी भर देत असते.या गावामध्ये आजवर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.त्यामध्ये आज अंगणवाडीचा पोषण आहार बायोगॅसवर शिजवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ़ वसई पर्ल्सच्या माध्यमातून अंगणवाडी क्र.३ ला बायोगॅस प्लांट देणगी दाखल देण्यात आला.पालघर जिल्ह्यात हा पहिलाच प्रकल्प आहॆ. अंगणवाडीतील पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची या प्रकल्पामुळे बचत होणार असुन जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.…

Read More