दीपक मोहिते,
कार्यकर्त्यांनो मरगळ झटकून कामाला लागा- माजी आ.हितेंद्र ठाकूर,
काल नालासोपारा पूर्व आणि पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची बैठक माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विवा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.या बैठकीला सुमारे अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या आवेशपूर्ण भाषणाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला.
यावेळी मार्गदर्शनपर केलेल्या आपल्या जोशपूर्ण भाषणात ठाकूर म्हणाले,या निवडणुकीतील पराभवाने आपण खूप काही शिकलो.आपल्याकडून चुका झाल्याचे मान्य करून त्यांनी आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे,असे सांगून आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.या निवडणुका आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच आहेत.त्यासाठी मरगळ झटकून कामाला लागा.झालेल्या पराभवाची खंत जरूर आहे,पण आम्ही हिंमत हरलो नाही,आजही आम्ही कार्यालयात बसून लोकांची गाऱ्हाणी ऐकतो,अधिकाऱ्यांना फोन करून कामे करण्यास सांगत असतो.राजकारणात हार जीत होत असते,पण एका पराभवाने खचून जायचं नसतं,तर लढायचं असतं.आपल्यालाही आता लढायचं आहे.त्यामुळे कामाला लागा.त्यांच्या या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी माजी आ.क्षितिज ठाकूर,माजी उपमहापौर उमेश नाईक,विरारचे माजी नगराध्यक्ष मुकेश सावे व अन्य मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात संघटन मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल,याविषयी आपली मते मांडली,यावेळी ठाकूर हे ही सारी भाषणे गांभीर्याने ऐकत होते.अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पक्षातील अनेक त्रुटीकडे त्यांचे लक्ष वेधले.
माजी आ.ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभर विविध भागांतील कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर आता पुढील रणनिती आखण्यासाठी पावले उचलली आहेत.काल झालेल्या या बैठकीपासून त्याची सुरुवात झाली आहे.लवकरच पक्षात नवीन नियुक्त्या होणार असल्याचे संकेत देखील मिळू लागले आहेत.

