सुनील तायडे,
विरार-कारगिलनगर येथे महिला मेळावा संपन्न,
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता भेरे यांनी काल कारगिलनगर टेपाचा पाडा येथे शेतीच्या शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यास परिसरातील दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते.
सहभागी महिलांनी सर्व खेळात सहभागी होऊन आनंद लुटला.या मेळाव्यात अनेक महिलांनी आपल्या भाषणात माजी आ.हितेंद्र ठाकूर व माजी आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या मेळाव्याला दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.या सर्व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला मंडळ,एकता महिला मंडळ,तनिष्क व्यासपीठ महिला मंडळ,कुणबी महिला मंडळ,जयदुर्गा महिला मंडळ व अन्य महिला मंडळानी सहकार्य दिले.त्यांच्या या योगदानाबद्दल माजी नगरसेविका संगीता भेरे यांनी सर्वांचे आभार मानले.

