संजय लांडगे,वाडा,
अंगणवाडीला बायोगॅस प्लांट,
जिल्ह्यात पहिलाच उपक्रम,
खानिवली ग्रामपंचायत ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात वाडा तालुक्यात अग्रेसर असुन वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबवण्यात येत असतात.गावाचा शास्वत विकास करायचा असेल तर अनेक नैसर्गिक संसाधनाचा वापर होणे गरजेचे आहे.पर्यावरणाचे रक्षण v संवर्धन करण्यावर ग्रामपंचायत नेहमी भर देत असते.या गावामध्ये आजवर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत.त्यामध्ये आज अंगणवाडीचा पोषण आहार बायोगॅसवर शिजवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ़ वसई पर्ल्सच्या माध्यमातून अंगणवाडी क्र.३ ला बायोगॅस प्लांट देणगी दाखल देण्यात आला.पालघर जिल्ह्यात हा पहिलाच प्रकल्प आहॆ. अंगणवाडीतील पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरची या प्रकल्पामुळे बचत होणार असुन जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे. यावेळी लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सरस्वती शंकर,वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे,बालविकास प्रकल्प अधिकारी अस्मिता बिर्जे, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन विकास सराफ,सी.एस.आर. चेअरपर्सन उमेश जोशी, लायन्स क्लब ऑफ़ गोकुलधाम यशोधामच्या अध्यक्षा ज्योतिताई कुलकर्णी,लायन गुप्ताजी, संगीता भुतानी,राजन भुतानी, लायन्स क्लब ऑफ़ वसई पर्ल्सच्या अध्यक्षा वर्षाताई मोदगेकर,सी.ए.उमेश मेस्त्री, ललित शिंगरे,माजी अध्यक्ष लायन यशवंत जाधव, ग्रा.पं.सदस्य प्रेरणा पोटींदा, सारिका पाटील,नितिन पाटील,पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गुरुनाथ पाटील यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

