Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” पापाचा घडा भरतो,तेंव्हा नियतीची कुऱ्हाड कोसळतेच…. दोन दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एका वादग्रस्त व भ्रष्ट असलेल्या प्रभारी सहा.आयुक्ताला पोलिसांनी गजाआड केले.हा अधिकारी गेल्या काही वर्षांपासून आपल्या भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरला होता.वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती.पण,त्याला सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्याचे संरक्षण असल्यामुळे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.या नेत्यामुळेच त्याला अनेक मलईदार प्रभाग समित्या लाभल्या.या अधिकाऱ्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला तर त्याच्या पाठीशी असलेल्या राजकीय नेत्याचा काळाकुट्ट चेहरा समोर येऊ शकेल. या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे १७ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला.एकेकाळी नवघर – माणिकपूर नगरपरिषदेत लिपिक पदावर काम करणाऱ्या नालायक माणसाला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” … मग हे सरकार,” गतिमान,” कसे ? गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचे सोहळे राज्यात वाजत गाजत साजरे होत आहेत.त्यासाठी राज्यात सर्वत्र मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत.त्यांचे सरकार किती गतिमान आहे,याविषयी महायुतीचे नेते सध्या गोडवे गात आहेत.अनेक नेत्यानी आपल्या सरकारला दहापैकी दहा गुण देखील देऊन टाकले.परंतु फडणवीस सरकारच्या राज्यात सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे किती प्रश्न मार्गी लावले,शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का ? महागाई कमी झाली का ? वर्षभरात किती रोजगारनिर्मिती झाली ? राज्यातील गुन्हेगारी कमी झाली का ? भ्रष्टचारावर नियंत्रण आले का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे केवळ नकारार्थीच मिळतात.मग हे सरकार गतिमान कसे,असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजप,बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने बविआला खिळखिळा करण्याचा जणू विडाच उचलला आहे.गेल्या महिन्याभरात त्यांचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी आपल्या जाळ्यात ओढले.वास्तविक, भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणकुण लागताच बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्वरित हालचाल करण्याची गरज होती.आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी,त्यांना ओळखता यायला हवी होती.गेली तीन दशके तालुक्यात वर्चस्व राखणारे तसेच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले हितेंद्र ठाकूर हे गेल्या दोन वर्षांपासून चांगलेच गाफील राहिले.तसेच प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी पक्षाची धुरा हळूहळू आपल्या मुलाकडे सोपवली.त्यामुळे पक्षाच्या दोन जनरेशनमध्ये मोठी दरी निर्माण झाली.राजकारण व समाजकारण करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणे,अनिवार्य असते.पण…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” मतमोजणी पुढे ढकलणे,मतदारांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करण्यासारखे…. केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार दिवसेंदिवस सैरभैर होत असून त्याचा फटका सर्वसामान्य मतदार व राजकीय पक्षांना बसत आहे.अशा या बदनाम केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आगपाखड करत असतात.यंदा भाजप,हा प्रथमच आयोगावर तुटून पडला आहे.एरवी भाजप आयोगाची बाजू घेऊन विरोधकांना खडे बोल सूनवत होता.तोच भाजप आता आयोगाला खडे बोल सूनवु लागला आहे.भाजपच्या वागण्यात अचानक झालेला बदल हे सारे विस्मयजनकच आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गेल्या बारा वर्षातील कारभार पाहता या संस्थेची विश्वासार्हता व पारदर्शकता पार रसातळाला गेल्याचा अनुभव मतदारांनी पावलोपावली घेतला.अनेक प्रकरणी त्यांनी संशयास्पद निर्णय दिले.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे त्यांच्याविषयी असलेले ममत्व…

Read More

दीपक मोहिते, २ डिसें.नंतर काय होणार ? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज होणाऱ्या निवडणुकांपैकी काही नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूकाना,निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.आयोगाच्या या निर्णयाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अंगाची लाही लाही झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी आयोगावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.आपल्या मनाविरुद्ध एखादा निर्णय झाला की भाजपचे नेते चवताळून उठतात.त्यांची आयटी टीम लगेच कामाला लागते.आपण वाटप केलेला पैसा वाया गेला म्हणून हा थयथयाट झाला असावा,अशा संशयाला जागा आहे.या निवडणुकीत कोटी कोटीची उड्डाणे झाली,मालवण येथे जे काही महाभारत घडले,त्यावरून यापुढे काहीही होऊ शकते,अशी आपली धारणा झाल्यास,ते चुकीचे ठरू नये.मालवणच्या निवडणुकीत मतदारांना वाटप करण्यासाठी त्या शहरातील आठ ते दहा घरात…

Read More

दीपक मोहिते, निवडणुक रणसंग्राम, माजी निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन आज हयात असते तर … गेले दहा दिवस सुरू असलेल्या नगरपरिषदा व नागरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता थांबणार असून आजची रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची रात्र आहे.कारण,रात्रीच्या अंधारात ” रात्रीचा खेळ चाले,” या प्रयोगाचा खेळ हा गेल्या दहा दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरवणारा असतो.त्यामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याना रात्रभर ” जागते रहो,” च्या भूमिकेत राहावे लागते. गेल्या १२ वर्षापासून आपल्या देशात रात्रीच्या वेळी ” पैश्याचा खेळ चाले,” हा नवीन खेळ सुरू झाला आहे आणि हा खेळ तुमच्या आमच्या मनात रुजवण्याकामी या नाट्याचे निर्माते कमालीचे यशस्वी झाले आहेत.त्यामुळे या खेळात कोटी,कोटीची उड्डाणे पाहायला मिळू…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीच्या प्रचारावर यंदा सोशल मीडियाचा मोठा प्रभाव,इतर माध्यमात मात चिंतेचे वातावरण… ग्रामीण भागात नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार धूमधडाक्यात सुरु असून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी यावेळी प्रचारात प्रसिद्धी करण्यासंदर्भात वारेमाप खर्च करण्याचे टाळले आहे.त्यांच्या आयटी टीमने प्रचारासाठी सोशल मीडियाचा चांगला आधार घेतला आहे.तर अनेक उमेदवार फेसबुक,व्हाट्सअप, इंस्टाग्राम,इ.चा बेमालूम वापर करत आहेत.या माध्यमातून उमेदवार स्वतः थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.त्यामुळे पैसा व वेळेची चांगलीच बचत होत आहे.प्रचार संपण्यास आता अवघे ३६ तास उरले आहेत.या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद,पंचायत समित्या व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.या सर्व निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचाराचा फोकस ” परिसर विकास व सर्वंसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या…

Read More

दीपक मोहिते, ” कुरुक्षेत्र,” वसई – विरार उपप्रदेशात महाविकास आघाडीचे नाणे चालणार नाही… सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.त्यामुळे राजकीय क्षितिजावर हालचालींना वेग आला आहे.शहरी व ग्रामीण भागात आपले पाय घट्टपणे रोवण्यासाठी राजकीय पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात.राज्यस्तरावर युती व आघाड्या होत असल्या तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या प्रयत्नात असतात.कारण,प्रत्येक पक्षाला सत्तेत वाटेकरी नको असतो.युती व आघाड्या झाल्यास जागावाटपात त्यांच्या वाट्याला अपेक्षित असलेल्या जागा मिळत नाहीत.त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना उद्धव व…

Read More

दीपक मोहिते, बॉटमलाईन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये बखेडा… प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विरोधी पक्षासह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते फोडण्याचा जो सपाटा लावला आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.पंधरा दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता.त्यामुळे महायुतीमध्ये सारे काही आलबेल नाही,हे उघड झाले.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकतेच ” मला २ डिसें.पर्यंत युती टिकवायची आहे,” असे विधान केले.त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडवून दिली. त्यांनी केलेल्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी पलटवार करताना चव्हाण यांना चांगलेच खडे बोल सुनावले.त्यामुळे महायुतीचा रबर आता मोठ्या प्रमाणात ताणला गेल्याचे उघड झाले आहे.पूर्वी भाजप…

Read More

दीपक मोहिते, निवडणूकपर्व, अखेर अनिश्चितता संपली,न्यायालयाच्या निर्णयाने नागरिकांना मिळाला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात आज दिलेल्या निकालाने महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे.आजच्या त्यांच्या या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद,पंचायत समित्या व महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सर्वं थरावरून स्वागत झाले.हे स्वागत होणे साहजिकच आहे. शहरी व ग्रामीण भागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार,हा प्रदीर्घ काळ नोकरशाहीच्या ताब्यात राहणे,हे न्यायाला धरून नव्हते.त्यामुळे या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सतत लांबणीवर पडणे,हा प्रकारच मुळात नागरिकांचे हक्क व अधिकाराला बाधा आणणारा होता.पण राज्य सरकार व निवडणूक आयोग/ न्यायपालिका यांच्या मिलिभगतामुळे नागरिकांना आपले अधिकार व हक्कापासून प्रदीर्घ काळ वंचित राहावे लागले.…

Read More