दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
नॅशनल डेस्कसाठी,
आजच्या भारत बंदमध्ये कामगार व शेतकरी सामील,
आज देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे या बंदमध्ये सुमारे ३० कोटीहून अधिक कामगार सामील होणार आहेत. आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंदपैकी हा बंद असण्याची शक्यता आहे.या बंदमुळे संपूर्ण देशाचा कारभार ठप्प होणार आहे.या बंदला देशभरातील शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिल्यामुळे त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या चार कामगार कायद्यामुळे औद्योगिक कामगारांच्या नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.हे नवीन कायदे कामगारांना कामावरून काढून टाकण्यासाठी मालकांना व्यापक अधिकार देतात,तसेच कामगारांना असलेले अधिकार व हक्क यांना बाधित करतात,त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दहा केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला आहे.
भारत – अमेरिका व्यापारी करार,मनरेगामधील बदल,बिवी – जीआरजी सारख्या विषयावर देशातील औद्योगिक कामगार संघटना,शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलामुळे कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. या बंदमध्ये इंटक, आयटक, एचएमएस,सिटू, एआयसीसीटीयु, युटीयुसी, सेवा, एलपीएफ,
एआययुटीयुसी, टियुसीसी या केंद्रीय कामगार संघटना सामील झाल्या आहेत.
या बंदमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम होणार आहे.

