- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राज्याच्या राजकारणाची अधोगती सुरू, ” युद्ध व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,” असं म्हंटल जातं ते खरंच आहे.पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे,त्याचे ” राजकारणाची अधोगती,” असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये.दीड दशकापूर्वी दोन ठाकरे बंधू एकमेकांच्या उरावर बसले होते,तर दोन वर्षांपूर्वी काका-पुतण्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष निर्माण होऊन पक्षाची दोन शकले झाली. स्वार्थी राजकारणाचा हा परिपाक होता.पुतण्याने पक्ष, चिन्ह व आमदार पळवल्याचे सांगत काकाश्रीनी राज्यभरात आपला ऊर बडवला.आज तेच काका/पुतण्या व दोन ठाकरे बंधू ” आम्ही एकत्र आलो तर आश्चर्य वाटता कामा नये,” असा ढोल पिटण्यात धन्यता मानत आहेत.गेल्या ६६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाची…
दीपक मोहिते, ” विनाशकाले विपरीत बुद्धी, ” भारताने पाकची अनेक शहरे केली बेचीराख… काल पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या वायुदलाने तो हाणून पाडला.यावेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानची चार ते पाच विमाने पाडली व त्यांच्या तीन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.आपण केलेल्या लष्करी कारवाईंनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या एक तृतीयांश भुभागावर मुसंडी मारली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात अफरातफरी माजली आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला पदावरून हटवण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.दरम्यान तुर्कस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानात पोहोचले असुन या विमानात ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात प्रखर हल्ले चढवल्यामुळे सर्वत्र ब्लँकआउट घोषित…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात वातावरण…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार प्रमुख शहरे स्फ़ोटानी हादरली, भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे. भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन, तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा पंचायत समिती तलासरी सभागृह येथे आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी आर. यु.ईभाड यांनी केले.या कार्यशाळेत खरीप हंगाम नियोजन व २०२५ या वर्षात घ्यावयाचे कार्यक्रम याविषयी त्यांनी सादरीकरण केले. तसेच कृषी विभागाकडून लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील संनियंत्रण अधिकारी म्हणून विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर हे उपस्थित होते.त्यांनी भात लागवडीची माहिती देताना खर्चाच्या बाबी कशा कमी करता येतील,याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया,उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच…
सफाळे प्रतिनिधी, वेढी गावात शॉक लागून एकाच मृत्यू, सफाळे पश्चिमेस असलेल्या वेढी गावातील रहिवाशी मोरेश्वर लोहार हे बकऱ्या चरण्यासाठी गावाच्या पश्चिम भागात गेले असता त्याना तुटून पडलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. काल रात्री अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजेची तार तुटून पडली होती. ही तार मोरेश्वर लोहार यांना दिसली नाही,तारेवर त्यांचा पाय पडताच विद्युत प्रहावामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका लागून ते मृत्युमुखी पडले. घटनेची खबर लागताच सफाळे पोलिसांनी पंचनामा केला व त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सफाळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेने वेढी गावावर शोकाकळा पसरली.
नवीन पाटील, सफाळे अवकाळी पावसामुळे सफाळ्यात मोठे नुकसान, पालघर जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.रात्री उसंत घेतल्यानंतर काल दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित होवून नागरिकांची त्रेधा तिरापिट उडाली. परिसरातील अनेक घराचे पत्रे उडाले तसेच उन्हाळी भात पीक,आंबा बागायती,जांभूळ, मिरचीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे सफाळे भागातील आगरवाडी,चटाळे,, येथील घरांचे तर टेंभीखोडावे येथील शाळेच्या स्टेजवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सफाळे,नांदाडे,गेरूचा ओहोळ आदी ठिकाणी घरावर आणि रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या असंख्य घटना घडल्या.यात उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश बंटी म्हात्रे आणि सर्पमित्र टीमने काल दिवसभर दुर्घटनग्रस्त ठिकाणी मदतकार्य केले.अचानक पाऊस…
तलासरीत वादळी पावसामुळे ७० घरांचे नुकसान, सुरेश काटे – तलासरी दि. 07 काल व आज तलासरी भागात पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तलासरी तालुक्यातील जवळपास ७० घराचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात येत असून तलासरी तहसीलदार अमोल पाठक स्वतः नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून माहिती घेत आहेत. काल रात्री तसेच आज दुपारपासून तलासरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे भागातील अनेक घराचे नुकसान झाले,अनेक घरांचे पत्रे उडून गेले.घरकुल बांधण्यासाठी अनेकांनी आपली घरे मोडून ठेवली होती,पण अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रीकिनारी असलेल्या झाई गावाला बसला तसेच या पावसामुळे वीटभट्ट्याचे मोठ्या प्रमाणात…
जव्हार प्रतिनिधी, जगदंबा बोहाडा उत्सव ; १५ ते १७ मे २०२५ दरम्यान भव्य आयोजन, जव्हार तालुक्यातील मौजे चालतवड येथे १५ ते १७ मे दरम्यान जगदंबा बोहाडा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात ग्रामस्थ,नातेवाईक, आजूबाजूच्या गावांतील भाविक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. या उत्सवात पारंपरिक सोंगे, आदिवासी लोककला सादरीकरण,मिरवणूक,आणि जगदंबा देवीचे पूजन,असे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.बोहाडा सोंगांचे संबळ वाद्य मिरवणूक,तसेच पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे सादरीकरण,ही या उत्सवाचे खास आकर्षण असते.त्यामुळे उपस्थित भाविकांना पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव मिळतो.चालतवड गावातील सार्वजनिक जगदंबा बोहाडा उत्सव हे गावाचे गौरवशाली…
दीपक मोहिते, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल, दहशतवाद्यांविरोधात भारतीय वायू दलाने मोठी कारवाई केल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं,काय उपाययोजना कराव्या,यासाठी नागरी संरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत.हे मॉक ड्रिल करताना हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅकआऊट कसा करावा,सुरक्षित ठिकाणी कसं जावं,इमारतींखाली कसं जमा व्हावं,याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही हायअलर्ट मोडवर आले आहे.प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना…
