दीपक मोहिते,
” विनाशकाले विपरीत बुद्धी, ”
भारताने पाकची अनेक शहरे केली बेचीराख…
काल पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या वायुदलाने तो हाणून पाडला.यावेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानची चार ते पाच विमाने पाडली व त्यांच्या तीन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे.आपण केलेल्या लष्करी कारवाईंनंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानच्या एक तृतीयांश भुभागावर मुसंडी मारली आहे.

भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या सियालकोट शहरात अफरातफरी माजली आहे. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याला पदावरून हटवण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.दरम्यान तुर्कस्तानचे कार्गो विमान पाकिस्तानात पोहोचले असुन या विमानात ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात प्रखर हल्ले चढवल्यामुळे सर्वत्र ब्लँकआउट घोषित केले आहे. भारतीय वायुदलाने कराची बंदर बेचीराख केल्यामुळे त्यांच्या नाविक दलाचे कंबरडे साफ मोडून मोडले आहे. पाकिस्तानमध्ये होणारे सुपर लीगचे क्रिकेट सामने आता दुबईत होणार आहेत.अनेक परदेशी क्रिकेटपटूनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.पाकिस्तान सरकारने कराची,इस्लामाबाद, रावळपिंडी,लाहोर,मधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या शेकडो सैनिकांना ठार मारले आहे.

