सफाळे प्रतिनिधी,
वेढी गावात शॉक लागून एकाच मृत्यू,
सफाळे पश्चिमेस असलेल्या वेढी गावातील रहिवाशी मोरेश्वर लोहार हे बकऱ्या चरण्यासाठी गावाच्या पश्चिम भागात गेले असता त्याना तुटून पडलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला.
काल रात्री अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीजेची तार तुटून पडली होती. ही तार मोरेश्वर लोहार यांना दिसली नाही,तारेवर त्यांचा पाय पडताच विद्युत प्रहावामुळे त्यांना विजेचा जोरदार झटका लागून ते मृत्युमुखी पडले.

घटनेची खबर लागताच सफाळे पोलिसांनी पंचनामा केला व त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सफाळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.या घटनेने वेढी गावावर शोकाकळा पसरली.

