तलासरीत वादळी पावसामुळे ७० घरांचे नुकसान,
सुरेश काटे – तलासरी दि. 07
काल व आज तलासरी भागात पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे तलासरी तालुक्यातील जवळपास ७० घराचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात येत असून तलासरी तहसीलदार अमोल पाठक स्वतः नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून माहिती घेत आहेत.

काल रात्री तसेच आज दुपारपासून तलासरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे भागातील अनेक घराचे नुकसान झाले,अनेक घरांचे पत्रे उडून गेले.घरकुल बांधण्यासाठी अनेकांनी आपली घरे मोडून ठेवली होती,पण अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रीकिनारी असलेल्या झाई गावाला बसला तसेच या पावसामुळे वीटभट्ट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मौजे ठाकरपाडा येथे दीपक चैत्या पाटकर यांच्या घराचा पंचनामा करताना महसूल कर्मचारी,

