सुरेश काटे,तलासरी
तलासरीत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन,
तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा
पंचायत समिती तलासरी सभागृह येथे आ.विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी आर. यु.ईभाड यांनी केले.या कार्यशाळेत खरीप हंगाम नियोजन व २०२५ या वर्षात घ्यावयाचे कार्यक्रम याविषयी त्यांनी सादरीकरण केले.
तसेच कृषी विभागाकडून लाभ घेतलेल्या शेतकरी बांधवांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील संनियंत्रण अधिकारी म्हणून विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर हे उपस्थित होते.त्यांनी भात लागवडीची माहिती देताना खर्चाच्या बाबी कशा कमी करता येतील,याबाबत मार्गदर्शन केले.
शेतकरी बांधवांना बीज प्रक्रिया,उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
तसेच उगवण क्षमता चाचणीमध्ये १०० बिया घेऊन फडक्यावर दहा दहाच्या ओळीने टाकून त्याची गुंडाळी करून दाखवले. यामध्ये जर ८० च्या पुढे बिया उगवून आल्यातर बियाणं चांगलं असल्याचे समजावे,असे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी आ.विनोद निकोले यांनी मार्गदर्शन करताना, खरीप हंगामाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच भात पिकावरील येणाऱ्या खर्चाच्या समस्या या विविध लागवड पद्धतीने कसे कमी करता येती, याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे तसेच ज्यांनी कृषीला महत्त्व दिले त्यांचा विकास झालेला आहे,दिसून येतो.या कार्यक्रमासाठी कृषी भूषण शेतकरी यज्ञेश सावे यांनी त्यांच्या मनोगतमध्ये शेतकरी बांधव उत्पादन करू लागला,परंतु मार्केटिंग बाबत माहिती हवी तेवढी अवगत करू शकला नाही,त्यामुळे शेतकरी बांधवांनी उत्पादनाकडून मार्केटिंगकडे वळले पाहिजे.तसेच तरुण मंडळी शेतीकडे विशेष लक्ष देत नसल्याने आपल्या पुढील पिढी याविषयी अनभिज्ञ राहील आणि दिशाहीन होतील.त्यामुळे तरुणांनी शेतीकडे लक्ष द्यावे,जेणेकरून शेती आपल्याकडे कायम टिकून राहील.शेतकरी व्यापारी बनला पाहिजे,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ वरठा यांनी भातलागवडीच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सदस्य, तालुक्यातील शेतकरी तसेच अमोल पाठक तहसीलदार तलासरी, कृषी अधिकारी पंचायत समिती विस्तार अधिकारी पंचायत समिती विमा कंपनीचे प्रतिनिधी,बँकेचे अधिकारी, आदी उपस्थित होते.
Trending
- बलाढ्य अमेरिकेला अखेर गुडघे टेकावे लागले……
- इस्त्रायलच्या हेकेखोरपणामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही…
- पक्षांतरबंदी कायदा ; कायद्यातील परिच्छेद ४ चा पुनर्विचार होणे गरजेचे….
- युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला..
- शिक्षक घरी येणार ; विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देणार, सरकारचे डोकं फिरलंय
- पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर,
- अखेर अमेरिका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव,
- धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा,


