दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पाकिस्तान भितीच्या सावटाखाली ; चार शहरे स्फ़ोटानी हादरली,
भारतीय वायू दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले.जैश ए मोहमद,लष्कर ए तोयबा व हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानातील तीन प्रमुख दहशतवादी गटाचे कंबरडे मोडले गेले.या कारवाईमुळे पाकिस्तानात हडकंप माजले आहे.
भारतीय सैन्याकडून अधिक हल्ले होतील,अशा भितीमुळे सीमेवरील अनेक गावे ओस पडली आहेत.दरम्यान जगातील अनेक देशांनी पाकीस्तानने भारताच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये,तसेच भारतानेही या प्रश्नी संयम बाळगावा असे म्हंटले आहे.दरम्यान पाकिस्तानच्या लाहोर शहरात गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी स्फोट झाल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बलुचिस्तान व पख्तुन ख्वा या दोन प्रांतात पाकिस्तान विरोधात वातावरण तापत चालले आहे.पख्तुन व बलोच हे दोन्ही समाज पाकिस्तानच्या विरोधात असून गेली ७७ वर्षे हे दोन्ही प्रांत स्वातंत्र्य लढा लढत आहेत.या दोन्ही समाजाला भारताकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.त्यामुळे भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे.युद्धाचा ज्वर हळूहळू वाढत असल्यामुळे केंद्रसरकारने देशातील २७ विमानतळे बंद केली आहेत.तर दुसरीकडे पाकिस्तानने इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी या चार शहरात ब्लॅक आउट करण्यास सुरुवात केली आहे.पाकिस्तानला चीन,तुर्कस्तान,अझरबैझान व मलेशिया या देशांनी पाठिंबा दिला असला तरी,त्यांनी या प्रकरणी सावध भूमिका स्विकारली आहे.

