दीपक मोहिते,
युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल,
दहशतवाद्यांविरोधात भारतीय वायू दलाने मोठी कारवाई केल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं,काय उपाययोजना कराव्या,यासाठी नागरी संरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत.हे मॉक ड्रिल करताना हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅकआऊट कसा करावा,सुरक्षित ठिकाणी कसं जावं,इमारतींखाली कसं जमा व्हावं,याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही हायअलर्ट मोडवर आले आहे.प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यावेळी राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पुढील सोळा ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.१.मुंबई २.उरण-जेएनपीटी
३.तारापूर
४.
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५.
१६. सिंंधुदुर्ग१९७१ च्या युद्धामध्येही राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं-
दरम्यान १९७१ मध्येही पाकिस्तानशी युद्धाचे ढग जमा झाल्यावर राज्या राज्यात मॉक ड्रील घेण्यात आलं होतं. शहरात सायरन वाजायचे, ब्लॅक आऊटचा सरावही केला जायचा.एबीपी माझाच्या हाती १९७१ च्या वेळचे काही फोटो हाती लागलेत.१९७१ मध्ये जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल काळ्या कपड्याने झाकून ठेवला होता.मॉक ड्रीलबाबत आणि युद्धादरम्यान घ्यायच्या काळजीबाबत तेव्हा विविध वृत्तपत्रांनी बातम्या करत जनजागृती केली होती. लष्कराने आणि जिल्हा प्रशासनाने गावोगावी मॉक ड्रील घेत सराव केला होता.
सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद करा-
हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत.कारण लाईट सुरु राहिले,तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे.जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही.याशिवाय,नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत.जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील,त्यांच्यावर लक्ष ठेवावे.याशिवाय,हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे,याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाईल. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरुन जाऊ नये,यासाठी मॉकड्रील महत्त्वाची आहे.
Trending
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
- पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक प्रक्रिया वेगात सुरु,
- पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार,


