- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, समुद्रधन वाचवणे, ही काळाची गरज, दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात येत असते.यंदाही १ जूनपासून ही बंदी लागू झाली असून ती सुमारे दोन महिने बंद राहणार आहे.हा काळ माश्याचा प्रजननाचा असल्यामुळे सरकार ही बंदी लादत असते.या काळात झालेली मासेमारी आपल्या व्यवसायावर गंडांतर आणते,हे लक्षात आल्यानंतर राज्यातील तमाम मच्छिमार संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला सर्वानुमते मंजुरी दिली.त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदी अंमलात येत आहे.या काळात मच्छिमार बोटी समुद्रकिनारी निवांत विश्रांती घेत असतात.प्रजनन काळात होणाऱ्या मासेमारीमध्ये माश्यांच्या छोट्या पिल्लांची कत्तल होत असते तसेच माश्याच्या अंड्याचाही नाश होत असतो व त्याचा परिणाम मत्स्य उत्पादन वाढीवर जाणवतो. गेल्या…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत, मे महिन्यात वीज पडून तलासरी तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्याचे दोन बैल मृत्यूमुखी पडले होते, तसेच वीज पडून दोघे जण जखमी झाले होते.त्यांना शासना तर्फे मदतीचा धनादेश आ.विनोद निकोले यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक,नायब तहसीलदार मुकणे,ग्राम महसूल अधिकारी दिपक घाटाळ उपस्थित होते. मे महिन्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.वरवाडा गावातील संपत जाना करमोडा यांच्या दोन बैलांवर वीज पडून ते मृत्युमुखी पडले. त्यांना नुकसानभरपाई रक्कम ६३ हजार ४०० रु.व सुत्रकार या गावातील वीज पडून जखमी झालेल्या मनीषा संदीप वळवी व तिच्या मुलगा आशिष संदीप वळवी यांना रक्कम १० हजार रु. ची आर्थिक…
सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक खताचा साठा, पालघर जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ( आरसीएफ ) कंपनीकडून सर्व कृषी सेवा केंद्रांना मंजूर आवंटनानुसार खत पुरवठा करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. खत पुरवठ्याचा संपूर्ण तपशील :- ( एप्रिल ते १३ जून २०२५ ):एप्रिल २०२५: मंजूर आवंटन १,३१० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,९४८ मेट्रिक टन.मे २०२५: मंजूर आवंटन १,७०२ मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा १,७७४ मेट्रिक टन.१३ जून २०२५ पर्यंत: मंजूर आवंटन २,७५० मेट्रिक टन; प्रत्यक्ष पुरवठा २,४७२…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकीय फायद्यासाठी जन्मदात्या बापाला बदलता येते का ? राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य असतं,असं म्हंटल जाते.ते एकप्रकारे खरंच आहे. पण राजकीय फायद्यासाठी आपला बापच बदलला जातो, याचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेला प्रथमच आला आहे.आपल्या हिंदू धर्मात आपले आईवडील हे दैवत मानले जाते.आता त्यापैकी वडिलांना बदलण्याची प्रक्रिया काही तथाकथित हिंदुत्ववादी नेत्याने सुरू केल्यामुळे आता सवाल – जबाबचा सिलसिला सुरू झाला आहे.शहर विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीला स्थगिती देण्यात आल्यामुळे आधुनिक काळातील या थोर पुत्राने आपला बापच बदलून टाकला.त्यामुळे उद्दिग्न झालेल्या त्याच्या ओरिजिनल बापाने आणि थोरल्या भावाने आपल्या धाकल्या भावाचे कान चांगलेच उपटले आहेत.पण आपल्या नेत्याला बाप बनवण्याच्या धुंदीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” निवडणुका पुन्हा लांबणीवर पडता कामा नये, दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला.याविषयी अधिकृतपणे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात आता हालचालीना सुरुवात झाली आहे.सर्वप्रथम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर येणाऱ्या हरकती व सूचनावर सुनावणी होणार आहे.या सुनावणीनंतर तयार करण्यात येणारा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी सगळे अडचणीचे मार्ग मोकळे होणार आहेत.अनेक वर्षे रखडलेल्या या निवडणुका आता मार्गी लागणार असल्यामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शिवसेनेचे ( उबाठा ) मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ही अधिसूचना…
दीपक मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टो.मध्ये होण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम काल जाहीर केला. त्यामुळे साधारणपणे या निवडणुका ऑक्टो.महिन्यात दिवाळीच्या आसपास होतील असा अंदाज आहे.एका प्रभागात चार सदस्य,अशी प्रभागाची रचना करण्यात येणार आहे.आयोगाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असुन भाजपने, या रचनेमुळे चारपैकी निदान एका प्रभागात घटक पक्षाला उमेदवारी देता येईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील अ + – वर्गात बृहन्मुंबई महानगरपालिका, अ वर्ग – पुणे,नागपूर,ब वर्ग – ठाणे,पिंपरी-चिंचवड,नाशिक, क वर्ग – कल्याण – डोंबिवली,छत्रपती संभाजी नगर,नवी मुंबई व वसई विरार, ड वर्ग – सोलापूर,मीरा भाईंदर,भिवंडी – निजामपूर, अमरावती,नांदेड -…
जव्हार प्रतिनिधी, जव्हारच्या दुर्गम भागात ३६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप, पावसाळ्याची चाहूल लागली असुन जव्हार तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये श्री रामलाल जे.बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट,कफ परेड मुंबई यांच्या सौजन्याने आणि जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत जव्हार तालुक्यातील जंगलपाडा,ऐनापाडा, बरफपाडा,धिंडेपाडा, पारधीपाडा,गौंडपाडा, हनुमानपाडासाखरा या दुर्गम भागातील ३६० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्य तसेच टॉवेल व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये तांदूळ,डाळ, कडधान्य,साखर,चहा पावडर, गूळ,पोहे,साबण,मीठ,तेल, मसाला,हळद,थंड पेय,टॉवेल व छत्र्या यांचा समावेश होता. या सर्व साहित्याचे वितरण बगाडिया ट्रस्टचे सेवक अनिल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिव…
वसंत भोईर,वाडा वाड्याची अंकिता घोडविंदे मुंबई पोलीस सेवेत दाखल, वाडा तालुक्यातील घोडविंदेपाडा येथील अंकिता नामदेव घोडविंदे हीने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले.आता ती मुंबई पोलीस दलात सेवेत दाखल झाली आहे.घोडविंदेपाडा गावातील ही पहीलीच मुलगी पोलीस सेवेत रुजू झाली असून आईवडीलांसह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.अंकिताच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्रित येऊन ढोल- ताशांच्या गजरात गावभर तीची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या अंकिताने अनेक अडचणींना सामोरे जात आपले शिक्षण पूर्ण केले.तर लहानपणापासून तीने पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले होते.त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तीने अथक परिश्रम केले.अंकिताचे यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे,तर संपूर्ण गावातील तरुणाईसाठी…
वसंत भोईर,वाडा गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, गुरूदेव सिद्धपीठ अंतर्गत कार्यरत प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था,गणेशपुरी, रोटरी क्लब ऑफ कांदिवली वेस्ट आणि एस.ए.एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल तानसा खोऱ्यातील गरजू मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला.यामध्ये संस्थेतर्फे ४१ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुंबई कांदिवली वेस्टचे अध्यक्ष देवसिंग शहाणी,यज्ञेश भट,श्रीमती दीप्ती संघवी,श्रीमती जस्मिता भट तसेच प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली तीन दशके प्रसाद चिकित्सा संस्था तानसा खोऱ्यात आरोग्य,कृषी, महिला सक्षमीकरण,पाणी व स्वच्छता,शिक्षण आणि कला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन संस्थेने उचललेले…
दीपक मोहिते, जिल्ह्यातील प्रदूषण ; पालकमंत्र्यांनी बैठकांची नौटंकी बंद करावी, आज पालघर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर एक ऐतिहासिक बैठक पार पडली या बैठकीचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.या बैठकीत जिल्ह्यातील प्रदूषणाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली,असे जिल्हावासियांच्या कानावर आले.या ऐतिहासिक बैठकीनंतर प्रदूषणाच्या समस्या किती सुटतील,हे सांगणे जरा कठीणच आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणे,आजवर एकाही सरकारला शक्य झाले नाही.ते रोखण्याऐवजी राज्यांच्या प्रत्येक पर्यावरणमंत्र्याने व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खिसे भरण्याचे काम केले.परिसरात प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश धुडकावून ते सर्रास सुरू आहेत.वने आणि डोंगर परिसरात अनेक अनधिकृत दगडखाणी धुमाकूळ…
