वसंत भोईर,वाडा
मनसतर्फे कारवाई करण्याची मागणी,
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय क्रिंदे यांना वाडा तालुक्यात होत असलेल्या अमली पदार्थ विक्री विरोधात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली.
या सर्व गैरधंद्यात तरुणाई, कॉलेजचे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी चालले आहेत.या प्रकारामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत .तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस निरीक्षक वाडा यांच्याकडे कारवाई संदर्भात मागणी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थी सेनेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, संघटक विशाल गोळे, विभागाध्यक्ष भावेश बागुल आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

