दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
राहुल गांधी व प्रियंका गांधी या दोघा भावंडानी मोदी – शहा यांची सध्या झोप उडवली आहे…
ज्या राहुल गांधी यांना गेली दहा वर्षे मोदी – शहा व त्यांच्या टोळीने ” पप्पू,” सतत हिणवले,त्या राहुल गांधी यांनी त्यांना सध्या सळो की पळो करून सोडले आहे.अनेक प्रकरणात केंद्र सरकारला राहुल गांधी यांच्यामुळे माघार घ्यावी लागली आहे.काल राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जो काही पराभव झाला तो निवडणूक आयोगाच्या कुटील कारस्थानामुळे झाल्याचे पत्रकार परिषदेत माध्यमांच्या निदर्शनास
आणून दिले.महाराष्ट्र व हरयाणा राज्यात भाजपचा झालेला विजय न्यायाला धरून नव्हता,हे सिद्ध करण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले आहेत.त्यांच्या आक्रमकतेसमोर मोदी – शहा,अक्षरशः हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.तर दुसरीकडे प्रियांका गांधी – वाड्रा,या देखील लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण करत एनडीए सरकारची पिसे काढत आहेत.या दोघा भावांच्या आक्रमकपणामुळे ” काँग्रेस मुक्त भारत,” हे त्यांचे स्वप्न आता धुळीला मिळाले आहे.उलट काँग्रेस दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे.प्रत्येक अधिवेशनात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष सरकारवर तुटून पडत आहे.विरोधी पक्षाच्या हल्ल्याला तोंड देणे,सरकारला दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी राफेल खरेदी,इन्शुरन्सचे रोखे खरेदी,पीएम फंड,३७० कलम रद्द करणे,मणिपूर वांशिक दंगल,संभल व हाथरसच्या घटना,पंजाब व हरयाणा राज्यातील शेतकरी आंदोलन,उरी व पुलवामा आणि आता पहलगाम हत्याकांड,जातीनिहाय जनगणना व निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र व हरयाणा राज्याच्या निवडणुकीत बोगस मतदार घुसवणे,इ.प्रश्नावर केंद्र सरकारला घेरण्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी चांगलेच यशस्वी ठरले आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकामागोमाग धक्के देण्यास सुरुवात केली आहे.राहुल गांधी यांना रोखण्यासाठी मोदी यांच्या सरकारने अनिष्ट गोष्टीचा आधार घेतला.त्यांची
खासदारकी व निवासस्थान हिसकावून घेण्याचा केलेला प्रयत्न राहुल गांधी यांनी यशस्वीपणे हाणून पाडला. आज या दोघा भावडांच्या आक्रमकतेपुढे मोदी सरकारचे सभागृहात अक्षरशः वाभाडे निघत आहे.तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची त्यांना उत्तम साथ मिळत आहे.एकंदर
बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता, आता मोदी यांना वयाचे कारण दाखवून घरी बसवण्यासाठी संघाचे वरिष्ठ नेते कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.नागपूरच्या रेशीमबागेत ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय ) हालचाली सुरू झाल्या आहेत.गेल्या काही दिवसात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची वक्तव्ये पाहता,नितीन गडकरी याना लवकरच सुगीचे दिवस येतील असे वाटते.

