- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- आयाराम गयारामचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
- आम्हा मतदारांची ” सनद, “
- स्था.स्व.सं.च्या निवडणुका पुढील महिन्यात तरी होतील का ?
- कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
- राज्याचा विभागीय असमतोल दूर करण्याची गरज….
- जेंव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात…
- बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.सं.च्या निवडणुका लांबणीवर पडतील…
- एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस,
Author: दीपक मोहिते
पालघर, वसई पूर्व मुख्य रास्ता पाण्याखाली,रस्तावर खर्च झालेले लाखो रु.पाण्यात, वसई पूर्वेस मुंबई-अहमदाबद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दिवसभर अत्यंत धिम्यागतीने सुरू होती. वसई ते सातीवली फाटा दरम्यान दरवर्षी गुढघाभर पाणी भरते.त्यामुळे सातीवली फाटा,गोखीवरे,सातीवली गाव,वालीव,गवराईपाडा, भोयदापाडा हजारो नागरिकांना किमान चार ते पाच दिवस हालअपेष्टा सहन करावे लागते.या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता.याविषयी नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याची पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला व एप्रिल व मे या दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यासाठी लाखो रु.चा निधी खर्ची पडला.पण हा खर्च पहिल्याच पावसात वाहून गेला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेची…
पालघर, रहिवाशांना महसूल विभागाकडून नोटीसा, महसूल विभागाने जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या रहिवाश्यांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. डहाणूच्या तहसीलदारांनीही चिंचणी येथे वर्षानुवर्षे राहत असलेल्या मच्छीमार लोकांना अतिक्रमण केल्याचे नमूद करत ते राहत असलेली घर खाली करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.सदर नोटीसा घेऊन चिंचणी येथील मच्छीमारांचे नेत्यांनी आ.श्रीनिवाजी वनगा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. आले.या चर्चेदरम्यान आ.वनगा यांनी यावेळी वर्षानुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांना नियमाकुल करून घ्यावे,अशी विनंती तहसीलदाराना केली.त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे मच्छीमाराना काही अंशी दिलासा मिळाला आहे.भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात पालघर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी व पालघर विधानसभेचे आ.श्रीनिवास वनगा पालघर तालुका…
पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…
पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…
मुले होणार संगणक सुशिक्षित- आ. राजेश पाटील, पालघर, सर्वदा प्रतिष्ठान आणि नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवाडी आश्रम शाळेमधील १२ वी च्या विद्यार्थांसाठी मोफत एमएस-सीआयटी हा कोर्स मुलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवनीत फाउंडेशन हे आपल्या बेलवाडी आश्रमशाळेमध्ये १० उपलब्ध करणार असून सर्वदा प्रतिष्ठान अणि नवनीत फाऊंडेशन हे या केंद्राची संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे.मी देखील याच आश्रमशाळेचा विद्यार्थी होतो,आज मी आमदार झालो आहे, शिक्षणासाठी ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत,त्या सर्व मी उपलब्ध करुन देईन,असे आ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वदा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पटेल,नवनीत फाऊंडेशनचे वैभव चौहान, प्रणिता जाधव,वसई पंचायत समितीच्या…
सूर्या कालव्यांच्या होणार कायापालट, पाण्याची नासाडी थांबणार, डहाणू पूर्व, सूर्या कालव्यामधून ग्रामीण भागातील शेकडो गावांना उन्हाळ्यात रब्बी हंगामात पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र या कालव्यांची होणारी गळती लक्षात घेऊन सूर्या कालव्यांची नवीन आधुनिक पद्धतीने अस्तरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सूर्या प्रकल्पाचे कालवे दुरुस्ती अंतर्गत सूर्या उजवा मुख्य कालव्यावर ७ किमी अंतरावर थेरोंडापासून सोनाळे दरम्यान ही कामे करण्यात येणार आहेत. कोकणातील पाच जिल्हातील इतर कालव्यापैकी पहिल्यांदा पालघर जिल्ह्यात या मुख्य कालव्यावर डहाणू तालुक्यातील वाघाडी जवळ पेव्हर कॉक्रीटीकरण नवीन पद्धतीने काम करण्यात आले आहे. या ,७ कि.मी.लांबीच्या कामासाठी १९ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षात सूर्या कालव्यांची…
पालघर, औषध कंपनीला भिषण आग,कोणतीही जीवितहानी नाही, तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सफायर लाईफ सायन्सेस औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीला आग लागली आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र या कंपनीच्या आजूबाजूला बांधकामे झाली असल्यामुळे आग विझवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते,ही आग कशामुळे लागली,हे देखील अद्याप समजू शकले नाही.
दीपक मोहिते, ” आम्हा जिल्हावासीयांच्या हालअपेष्टा,” दर पावसाळ्यात जिल्हावासीय भोगताहेत हालअपेष्टा, यंदाही पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यावासियाना सलग ३ ते ४ दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे.सध्या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत:कोलमडून गेले आहे.या जलप्रलयामध्ये लोकांच्या मालमत्तेचे,राहत्या घरांचे कधीही भरुन न येणारे असे नुकसान झाले आहे.वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यानी जिल्ह्याचा दौरा करणे अपेक्षीत होते.विकासकामाचे उदघाटन व विविध इन्व्हेंटच्या निमित्ताने जिल्ह्याचा दौरे करणारे हे दोघेही जिल्ह्यात कुठेही फिरकले नाहीत.पण दरवर्षी अशी स्थिति का निर्माण होते,त्यामागची कारणे काय आहेत ? याबाबत त्यांनी साधी विचारपुसही केली नाही. निसर्गाच्या या अस्मानी संकटासमोर सर्व शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने जिल्हा व…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उंदरांच्या पळापळीला येणार वेग, राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा वाढता प्रभाव व त्यांच्या गटाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश,अशा दोन कारणांमुळे फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकूटाना घाम फुटला आहे.त्यामुळे त्यांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आता माघारी फिरू लागले आहेत.अजित पवार गटाचे पुण्यातील १५ ते २० खंदे पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शरद पवार यांचे बोट धरले.त्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शिंदे व अजित पवार गटाचे अनेक आमदारही ” सुबहका भुला, शामको घर लौटा,” अशा भूमिकेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पतन झाल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, आदिवासी समाज वनहक्क कायद्यापासून वंचित तर भूमाफिया व खदानमालक मात्र मालामाल, डोंगरदऱ्या व जंगलात राहणाऱ्या आदिवासींना उपजीविकेसाठी सरकारने अनु.जमाती इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६,२००८ व २०१२ हा वनहक्क कायदा लागू केला.जंगलामध्ये वास्तव्य करून जमीन कसणाऱ्या आदिवासींना जमिनीचा हक्क देणाऱ्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी २००८ साली सुरू झाली.हा कायदा लागू करण्यामागे आदिवासी लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे,असा उदात्त हेतू होता.पण राज्यातील वनहक्क दाव्यांची प्रलंबित प्रकरणाची संख्या लक्षात घेता,हा कायदा प्रभावी ठरू शकला नाही,असेच म्हणावे लागेल.गेल्या पंधरा वर्षात सरकारने राज्यातील वन हक्काचे दावे त्वरित निकाली काढावे,यासाठी वेळोवेळी आदेश काढले,तरीही राज्यात लाखो दावे प्रलंबित आहेत.या प्रक्रियेमध्ये महसूल व वनविभागाकडून प्रचंड…
