सूर्या कालव्यांच्या होणार कायापालट,
पाण्याची नासाडी थांबणार,
डहाणू पूर्व,
सूर्या कालव्यामधून ग्रामीण भागातील शेकडो गावांना उन्हाळ्यात रब्बी हंगामात पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र या कालव्यांची होणारी गळती लक्षात घेऊन सूर्या कालव्यांची नवीन आधुनिक पद्धतीने अस्तरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सूर्या प्रकल्पाचे कालवे दुरुस्ती अंतर्गत सूर्या उजवा मुख्य कालव्यावर ७ किमी अंतरावर थेरोंडापासून सोनाळे दरम्यान ही कामे करण्यात येणार आहेत. कोकणातील पाच जिल्हातील इतर कालव्यापैकी पहिल्यांदा पालघर जिल्ह्यात या मुख्य कालव्यावर डहाणू तालुक्यातील वाघाडी जवळ पेव्हर कॉक्रीटीकरण नवीन पद्धतीने काम करण्यात आले आहे. या ,७ कि.मी.लांबीच्या कामासाठी १९ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षात सूर्या कालव्यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे मुख्य कालवे तसेच उपकालवे नादुरुस्त झाले होते,या कालव्यातून पाणी गळती होत होती.काही ठिकाणी तर कालव्याना प्लॅस्टर तुटून पडल्यामुळे कालव्यांना भगदाडे पडली आहेत.त्यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात होते,त्यामुळे या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अपुरा पाणीपुरवठा होत नव्हता.मुख्य कालवेच नादुरुस्त झाल्यामुळे टोकावरील गावांना पाणी मिळत नव्हते.याप्रकरणी स्थानिक शेतकरी वारंवार कालवा दुरुस्तीची मागणी करत होते.
दरम्यान नादुरुस्त कालव्यांची आधुनिक पद्धतीने पेव्हर कॉक्रीटीकरण काम करण्यात येत असल्यामुळे पाण्याची गळती थांबणार आहे.त्याचा फायदा आम्हाला होईल,अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

