पालघर,
औषध कंपनीला भिषण आग,कोणतीही जीवितहानी नाही,
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सफायर लाईफ सायन्सेस औषध उत्पादन घेणाऱ्या कंपनीला आग लागली आहे.
घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र या कंपनीच्या आजूबाजूला बांधकामे झाली असल्यामुळे आग विझवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही,मात्र कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते,ही आग कशामुळे लागली,हे देखील अद्याप समजू शकले नाही.

