पालघर,
जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत,
अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना
जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी जव्हार पोलीस पुढील तपास करत आहेत.

