मुले होणार संगणक सुशिक्षित- आ. राजेश पाटील,
पालघर,
सर्वदा प्रतिष्ठान आणि नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवाडी आश्रम शाळेमधील १२ वी च्या विद्यार्थांसाठी मोफत एमएस-सीआयटी हा कोर्स मुलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवनीत फाउंडेशन हे आपल्या बेलवाडी आश्रमशाळेमध्ये १० उपलब्ध करणार असून सर्वदा प्रतिष्ठान अणि नवनीत फाऊंडेशन हे या केंद्राची संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे.मी देखील याच आश्रमशाळेचा विद्यार्थी होतो,आज मी आमदार झालो आहे, शिक्षणासाठी ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत,त्या सर्व मी उपलब्ध करुन देईन,असे आ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वदा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पटेल,नवनीत फाऊंडेशनचे वैभव चौहान, प्रणिता जाधव,वसई पंचायत समितीच्या माजी उपसभापती कविता किरकिरा,सतीश पाटील, दिगंबर पाटील, शाळेची मुले,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

