पालघर,
रहिवाशांना महसूल विभागाकडून नोटीसा,
महसूल विभागाने जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या रहिवाश्यांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. डहाणूच्या तहसीलदारांनीही चिंचणी येथे वर्षानुवर्षे राहत असलेल्या मच्छीमार लोकांना अतिक्रमण केल्याचे नमूद करत ते राहत असलेली घर खाली करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.सदर नोटीसा घेऊन चिंचणी येथील मच्छीमारांचे नेत्यांनी आ.श्रीनिवाजी वनगा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. आले.या चर्चेदरम्यान आ.वनगा यांनी यावेळी वर्षानुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांना नियमाकुल करून घ्यावे,अशी विनंती तहसीलदाराना केली.त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे मच्छीमाराना काही अंशी दिलासा मिळाला आहे.भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात पालघर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी व पालघर विधानसभेचे आ.श्रीनिवास वनगा पालघर तालुका प्रमुख संजय चौधरी,चिंचणी ग्रामपंचायतचे सदस्य नेहा ताई धानमेहर व मांगेला समाजाचे अध्यक्ष यतीश आकरे व अन्य सदस्य उपस्थित होते.

