Author: दीपक मोहिते

सचिन पाटील,विरार दोनघर येथे टॉयलेटचा उदघाट्न सोहळा संपन्न, जिल्हा परिषद शाळा दोनघर येथे टॉयलेट अनावरण सोहळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर टॉयलेट रोटरी क्लब ऑफ अमारा,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण,आशलंड कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे टॉयलेट बांधण्यात आले.त्याचा अनावरण सोहळा आज दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी अमारा क्लबच्या सुरेखा सदलापूरकर मॅडम,नडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता पवार मॅडम राहुल खिसतराव,भारती नाकवा,राजश्री आहेर,रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे बिजू उन्नीथान,कैलास देशपांडे, धीरेंद्र प्रतापसिंग,आशलंड कंपनीचे रजनी भट,सुजय परांजपे , विकास कातकीकर,प्रियांका विचारे,सुनील पाटील,भगवान खंडवी,हे मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विशे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.केंद्रप्रमुख संगीता पवार, बिजू उन्नीथान,सुजय…

Read More

जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न, कै.वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त, पंचायत समिती,जव्हार येथे कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” कृषी दिन,” उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करत कृषी दिनाचे ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व विशद केले आणि कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमात सुनील कामडी (रा.डेंगाची मेट) यांना ” वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१७ (आदिवासी गटात प्रथम क्रमांक)” प्राप्त झाल्याबद्दल गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांच्या हस्ते शाल,रोप व प्रमाणपत्र देऊन…

Read More

सुरेश काटे,तलासरी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्याची घटना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीने तलासरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल होऊन आरोपी तरुणांस अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच गावात राहत असून त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या दोन वर्षांपासून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक शोषण केले. पीडित तरुणीने लग्नाबाबत आरोपी तरुणांस विचारणा केली असता,त्याने लग्नास नकार देऊन पीडितेसह तरुणीच्या आई वडिलांस शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली.याप्रकरणी सदर पिडीत मुलीने तलासरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द नोंदवताच…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” ईडीच्या धाडी व रविंद्र चव्हाण यांची निवड ; विरोधकांच्या छातीत धडकी, काल दिवसभरात दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या.या घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे पारडे जड झाले आहे.निवडणुका जिंकण्याचे तंत्र अत्यंत धुर्तपणे आत्मसात करणारे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निवड व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाचे ( ईडी ) पुन्हा सक्रिय होणे,अशा दोन कारणामुळे विरोधकांच्या तंबूत सध्या घबराट निर्माण झाली आहे.सक्तवसुली संचलनालयाचा पालघर जिल्ह्यात लवकरच तिसरा अंक सुरू होणार आहे.या तिसऱ्या अंकामुळे विरोधी पक्षाचे अनेक नेते व माजी नगरसेवकांची ” पळता भुई थोडी,” होणार आहे.अनेक माजी नगरसेवक यंदाची निवडणूक लढवायची की नाही,अशा विवंचनेत सापडले…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल, येथे तर कुंपणच शेत खातयं…. मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीत उभारण्यात आलेल्या ६५ अनधिकृत इमारती संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये ३५० भूमाफिया,आयुक्त,९ प्रभाग समितीचे प्रभाग सहा.आयुक्त हे जबाबदार असल्याची नोंद केली आहे. या नोंदीची दखल घेऊन शासनाच्या एका अति उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधींच्या बैठकीत या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आग्रही राहण्याचे मत व्यक्त केले आहे.त्यामुळे भूमाफियासह सुमारे तीनशे ते चारशे जण अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामसंदर्भात खाजगी जमीन मालक,बांधकामधारक, वास्तुविशारद व इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणारे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी हे सारे जबाबदार आहेत,असे निरीक्षण नोंदवले आहे.अशा सर्व प्रकरणात भूमाफिया व अनधिकृत बांधकाम व्यावसायिक कुठेही कागदोपत्री…

Read More

दीपक मोहिते, ” खळबळजनक,” आजच्या कारवाईनंतर ईडीच्या रडारवर अनेक बिल्डर, आजची सकाळ,ही वसई विरार परिसरातील आर्किटेक्टस व मनपा अभियंत्यासाठी भितीने गाळण उडवणारी ठरली आहे. महानगरपालिकेच्या नगर रचना संचालकावर गेल्या मे महिन्यात ईडीचे छापे पडल्यानंतर बांधकाम व्यवसायिक,महानगरपालिका अधिकारी,अनधिकृत बांधकामातून रग्गड वसुली करणारे अधिकारी व राजकीय नेत्यांची चड्डी पिवळी झाली होती.अनेक आर्किटेक्टस व बिल्डरांनी परदेशात व गुजरात राज्यात पळ काढला होता. परिस्थिती निवळल्यानंतर अनेक जण पुन्हा वसईमध्ये परतले होते.पण त्यांच्यासाठी मंगळावर हा आज घातवार ठरला आहे. सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) आज सकाळी वसई,विरारमधील वास्तुविशारद ( आर्किटेक्ट ) आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक…

Read More

दिपक मोहिते, कृषी विशेष दिन, कृषीक्षेत्र घटण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग, आज १ जुलै रोजी राज्यात सर्वत्र कृषीदिन साजरा करण्यात येणार आहे.हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा १ जुलै हा जन्मदिवस,त्यानिमित्ताने राज्य सरकार दरवर्षी हा दिवस कृषीदिन म्हणून साजरा करत असते.आज राज्यभरात शासनस्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. १९७० च्या दशकात राज्यात अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती.त्यावर उपाययोजना करण्याकामी वसंतराव नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.आपले राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसे स्वयंपूर्ण होईल,यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते.त्याकाळात असलेली अपुरी संसाधने व प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविध उपाय योजले होते.त्यामुळे राज्याच्या कृषिक्षेत्रात क्रांती घडून आली…

Read More

सुरेश काटे,तलासरी, तलासरीत ” एक झाड आईसाठी,” स्तुत्य उपक्रम, ” एक झाड आई,साठी,” या अभियानांतर्गत तलासरी तालुक्यातील इंडिया कॉलनी या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,कॉलनीतील नागरिक सहभागी झाले होते. ” एक झाड आई साठी,” या अभियान अंतर्गत वड, आवळा,बेहडा,करंज, गुलमोहर अशा वेगवेगळ्या ४० औषधी वनस्पती लावण्यात आल्या. या सर्व रोपांना दत्तक घेण्यात आले.सदर रोपाची देखभाल जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लक्ष्मण ननवरे,अशोक थोरात, डॉ मोहन गायकवाड,जयराम कवडे,रेंजा गावित,अनिल मिश्रा,धनाजी कांबळे,दशरथ मोहरा,रीना जोशी,विनिता बाणे,संदेश गावित,विनिता दोषी,विजय दोशीअनिल पाडवी,कौशिक चौधरी,अनिल जमादार,हेमेंद्र पटेल,साईनाथ पवार,सिंगरिया इ. मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ” एक झाड आईसाठी,” अभियानमध्ये वरिष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन…

Read More

वसंत भोईर,वाडा अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि नवनवीन लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रमांची आखणी तसेच विविध धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायत अबिटघरच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत कार्यकारिणी सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांच्या प्रयत्नाना यश येऊन अखेर अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटन,) दर्जा प्राप्त झाला. विद्यमान सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील,सदस्य भरत जाधव,कुलदीप पाटील, धनश्री पाटील,भावना रायात, कल्याणी साठे,मनिषा मुकणे,निखिल पाटील,स्मिता चिमडा,कल्पेश आमले यांच्या सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील आणि त्यांच्या समवेत काम करणारे कर्मचारी यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण कामासोबतच संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आमची ग्रामपंचायत प्रगतीचे एक एक टप्पे पार करत असल्याची…

Read More

जव्हार प्रतिनिधी, ” याची देही, याची डोळा,” – जव्हारमध्ये दुसऱ्या वर्षी भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न. जव्हार नगरीत दुसऱ्या वर्षीही “ याची देही, याची डोळा,” या दिव्य अनुभूतीने भरलेली आणि भक्तिरसात न्हालेली भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पुरीच्या चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ धाम जव्हारमध्ये साकार होत असून,या प्राचीन परंपरेचा तेजस्वी वारसा इथेही दृढ होत असल्याचे स्पष्ट दिसून आले.रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गे नगरपरिक्रमा करत शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले. रथ ओढताना महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. रस्त्यावर फुलांची पखरण, गुलालाचे उधळण आणि “ हरे…

Read More