सुनील पाडवी,वसई
मध्यरात्री धुमाकूळ घालणाऱ्या बारवर वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची धाड,
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणीदरम्यान आ.स्नेहा दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली. यावेळी मॉलमधील विंग्स ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे डिजेच्या कर्णकर्कश आवाजात धुमाकूळ सूरू होता.तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले.

स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री २.३० वाजता हे बार कायदा मोडून सर्रासपणे सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले.
या संदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
“आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही, मात्र कायदा मोडून रात्री २.३० नंतर चालणाऱ्या बारविरोधात कारवाईची आमची भूमिका असेल,” असे आ.स्नेहा ताई दुबे पंडित यांनी स्पष्ट केले.आ. दुबे यांनी रात्रीच्या वेळी अचानक धाडी टाकण्याचे सत्र सुरु केल्यामुळे अवैध व्यवसाय करणारे समाजकंटक व भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

