सचिन पाटील,वसई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.दुबे-पंडीत यांची मध्यरात्री रस्त्यांची पाहणी,
आज वसईच्या आ.स्नेहा दुबे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री प्रत्यक्ष प्रत्येक स्थळांवर भेट देऊन रस्त्यांच्या पॅचवर्क,पेव्हर ब्लॉक व दुरुस्ती कामांची पाहणी केली.
यामध्ये १ ) अग्रवाल नाका परिसर,२ ) स्टार सिटी जूचंद्र, ३ ) वामन ढाबा ते तिवरी फाटा नायगाव पूर्व व ४ ) वसई ईस्ट-वेस्ट ब्रिज ते मधुबन वसई पूर्व या रस्त्यांचा समावेश होता.रात्री १.०० वाजता सुरु झालेला पाहणी दौरा पहाटे ०४.०० वाजेपर्यंत सूरू होता.या दरम्यान अखंड पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले.
कामाची गती व गुणवत्ता तपासून नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
या पाहणीवेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे,अभियंता समीर पाटील,अभियंता विवेक चौधरी,अभियंता ऋषिकेश मुळीक यांच्यासोबत थेट संवाद साधून कामाची गती व तांत्रिक बाबींची माहिती घेतली.तसेच या पाहणीदरम्यान नवीन दुबे,भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार,मानव दुबे, प्रवीण गावडे,संदीप पाटील,चंद्रकांत पाटील,धरेंद्र कुलकर्णी,अंशूमन ठाकूर,राजेश नायर,विकास सिंग,अक्षय कदम,नितीन फाटक,सुनील पांडे,निखिल बाबर तसेच शिवसेनेचे जिग्नेश म्हात्रे व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

