Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा गौराईमातेच्या आगमनासाठी वाडा तालुक्यातील बाजारपेठा सजल्या, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी गौराई मातेच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजवल्या आहेत. मात्र यंदा वाढलेल्या महागाईने खरेदीसाठी आलेल्या सामान्य भक्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यात वाडा,कुडूस,खानिवली,कंचाड,शिरीष पाडा,या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.या बाजारातील फळ विक्रेत्याच्या मनमानी व्यवहारावर नियंत्रण नसल्यामुळे व्यापारांच्या मनाप्रमाणे येथे फळांचे भाव असतात.मुंबई,ठाणे,कल्याण पेक्षाही येथे फळे चढ्या भावाने विकण्यात येत असतात. द्राक्षे -३५० रू.कि.लो.सफरचंद-१२० ते १६० रू.कि.लो. केळी ( वेलची )-७०ते ८०रू.डझन, साधी केळी-५०रू.ते ८०रू.डझन, पेरू-१०० रू.कि.लो.चिकू-१००रू.कि.लो.डाळिंब-१६०रू.कि.लो. नासपती-१२० रू.कि.लो.पपई-७०रू.नग, सुपारी-१० रू.नग असे भाव असून हे भाव सामान्य नागरिकाला न परवडत नाहीत.यावर प्रशासनाने नियंत्रण आणून योग्य दराने फळांची विक्री व्हावी.अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली…

Read More

दीपक मोहिते, ” अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके नेमा,” – आ.स्नेहा दुबे, वसई-विरार परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बेकायदा व धोकादायक बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.अलीकडेच विरार पूर्वेकडील विजयनगर येथे रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत १७ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या घटनेची गांभीर्याने दखल घेत वसई विधानसभा मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी वसई-विरार महानगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आयुक्ताना दिलेल्या निवेदनात त्यांनी अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम हा एक ज्वलंत आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणारा धोकादायक प्रकार असून तत्कालीन आयुक्तांच्या निदर्शनास काही बाबी आणल्या होत्या व त्यावर…

Read More

दीपक मोहिते, नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकार गोठवणारे ” जनसुरक्षा विधेयक – २०२४,” अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेणारा,एकत्र जमण्याचा,संघटना करण्याचा मौलिक अधिकार हिरावून घेण्याचा कायदा राज्य सरकारने नुकताच संमत केला आहे.ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे आणि याच महिन्यात स्वातंत्र्याची अशी गळचेपी करणारा कायदा सरकारने आणला आहे.कदाचित नागरिकांना आता तिसऱ्या स्वातंत्र्य युद्धाला सामोरे जावे लागणार आहे.पहिले १९४७ त्यानंतर दुसरे १९७५ साली आणीबाणीच्या काळात आपण धैर्याने लढलो.आता पून्हा आपल्यावर तशीच पाळी येण्याची शक्यता आहे.हा कायदा कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनाना लगाम घालण्यासाठी सरकारने ” अर्बन नक्षलवाद,” गोंडस नावाखाली हा कायदा लागू केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या कायद्याचा वापर…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यात भावपूर्ण वातावरणात शेकडो गणरायाला निरोप तालुक्यात काल दीड दिवसांसाठी घरोघरी आगमन झालेल्या बाप्पा मौज मजे सह गोड धोडांची लय लूट करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना,आम्हाला अशा घोषणा देत, ढोल ताशे बँजोच्या साथीने गुळाची उधळण करीत येथे गणरायाला निरोप देण्यात आला तालुक्यात हजारोंच्या संख्येने घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.गणपती विसर्जन काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उभा रण्यात आलेल्या कृत्रिम तलावात, तर काही ठिकाणी गणपती विसर्जन गावच्या नद्या,ओहोळ व तलावात करण्यात आले.यावेळी गणेश भक्तांमध्ये भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.काल वाड्यात दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे विसर्जनास गणेश भक्तांची चांगली तारांबळ उडाली होती.त्यामुळे पावसाच्या…

Read More

दीपक मोहिते, विरार दुर्घटना ; संबंधित अनधिकृत बांधकाम व्यवसायिकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनास्थळाची पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला तसेच राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रु.ची मदत जाहीर केली. यावेळी खा.डॉ.हेमंत सवरा, आ.स्नेहा दुबे,आ.राजन नाईक,वसई-विरार महानगरपालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी तसेच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला, २६ ऑगस्ट रोजी विरार पूर्वेस मध्यरात्री विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा भाग कोसळून सदर दुर्देवी घटना घडली.या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ महिला,८ पुरुष व ३…

Read More

दीपक मोहिते, ” भयानक वास्तव,” विरार येथील दुर्घटना ; दोन्ही आमदारांनी संक्रमण शिबिरासाठी प्रयत्न करावेत, वसई तालुक्यात हल्ली मरण खूप स्वस्त झालं आहे.कोणाला कधी मरण येईल,हे सांगणे सध्या कठीण झाले आहे.नागरिकांचे होणारे अपघाती मृत्यू लक्षात घेता याला कोण जबाबदार आहे ? याचा खोलात जाऊन शोध घेतल्यास दळभद्री विकासक,मुर्दाड बनलेली प्रशासकीय यंत्रणा व खादाड अधिकारी त्यास जबाबदार असल्याचे दिसून येते. विरार येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर इतर ९ जण जखमी झाले आहेत.रात्री साखरझोपेत असताना मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.क्षणार्धात या सर्व कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.आतापर्यंत इमारतीच्या मातीच्या ढिगाऱ्यात दबलेल्या २४ जणांचा शोध लागला आहे.या दुर्घटनेनंतर आपली प्रशासकीय…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपमध्ये जाणाऱ्यांची अवस्था निवडणुकीनंतर जेवणाच्या ताटाबाहेर फेकलेल्या कडीपत्याच्या पानासारखी होईल… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर भाजपने आपले वापरात असलेले अस्त्र बाहेर काढले आहे.गेल्या महिनाभरात भाजपने बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावले व आजही ती प्रक्रिया सुरूच आहे.बहुजन विकास आघाडीला भ्रष्टाचाऱ्याचा पक्ष म्हणून भाजप एकेकाळी हिणवत असे,आज तोच भाजप,बहुजन विकास आघाडीतील हवशे नवश्याना गोळा करण्यात दंग आहे.त्यासाठी त्यांनी भलीमोठी वॉशिंग मशीन आणून ठेवली आहे.पण,या लोकांना कितीही वेळा मशीनमध्ये टाकले तरी त्यांच्या अंगावरचा मळ कधीच खाली बसणार नाही.येणाऱ्या काळात अनेक बदनाम माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून त्यांना गवसणी घालण्यासाठी भाजप सज्ज झाला…

Read More

दीपक मोहिते, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ ; प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार… राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व प्रभागनिहाय मतदारसंख्या नुकतीच प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यादृष्टीने राजकीय पक्षाच्या हालचालींनाही चांगलाच वेग आला आहे. वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या एकूण २९ प्रभागामध्ये ११५ जागा असून सुमारे ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आहेत.या २९ प्रभागांपैकी २८ प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार,तर प्रभाग क्र.२९ मध्ये तीन उमेदवार असतील.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार खालीलप्रमाणे- प्रभाग क्र.- १ -४५,९५२, प्रभाग क्र.- २ -४१,४८६, प्रभाग क्र.- ३ -…

Read More

जव्हार प्रतिनिधी, रानभाज्या महोत्सवातून उत्पन्न वाढीची संधी, अनुसूचित जमातीतील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या पारंपरिक रानभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांची सार्वजनिक प्रसार व प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जव्हार,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, केंद्रवर्ती अर्थसंकल्प ( न्युक्लिअस बजेट ) अंतर्गत सन २०२५-२६ या योजनेंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गावागावात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या,रानफळे,वनौषधे तसेच अन्नधान्य यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना आर्थिक उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून,या औषधी गुणकारी रानभाज्यांचा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणराया तूच बघ रे बाबा… आज रस्त्याच्या महासंकटातून स्वतःला सांभाळत आमच्या गणरायाचे सुरक्षितपणे आगमन कसेबसे तरी झाले एकदाचे.बाप्पा आपल्या घरी सहीसलामतपणे पोहोचल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण हा आनंद केवळ दीड,पाच व अकरा दिवस टिकणारा आहे,याचे भान आमच्या गणरायाला आहे,तसेच त्यांच्या भक्तांना देखील आहे.आज भक्तांच्या घरी आगमन करताना गणरायाला अनेक मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागले.दरवर्षी गणेशाच्या आगमन होण्यापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी,हे आढावा बैठकीचे आयोजन करत असतात.या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी,रस्त्याची कामे करणारे ठेकेदार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतात.सदर बैठकीत गरमागरम चर्चा होते.प्रशासनातील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता,ठेकेदाराची मिलीभगत व राजकीय पदाधिकाऱ्यांची उदासीनता करदात्यांना पाहायला मिळते.वास्तविक…

Read More