दीपक मोहिते,
वसईमधील विविध विकासकामांचा आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते शुभारंभ,
वसईतील विविध रस्त्यांच्या विकासकामांचा भव्य शुभारंभ कार्यक्रम आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते काल पडला.
वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सुविधासाठी आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.
वसई आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील वसई भागातील रस्त्यांची दुरावस्था आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी वसई मतदारसंघाच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरील कामे तातडीने हाती घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याची विनंती केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या होत्या.
महानगरपालिका आयुक्तांनी सदर आदेशांचे त्वरीत पालन करून वसई तालुक्यातील महत्वाचे १४ रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करून त्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवली.
या कामांची विहीत प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यादेश महानगरपालिकेने जारी केले असून या १४ कामांपैकी ३ कामांचा शुभारंभ काल गुरुवार ६ नोव्हें.२०२५ रोजी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच उर्वरित ११ कामांची सुरुवात पुढील काही दिवसांत करण्यात येणार आहे.
उपरोक्त विकासकामांमुळे वसई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सुरक्षित,सुलभ आणि टिकाऊ रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहेत. शुभारंभ करण्यात आलेली कामे खालीलप्रमाणे :
( १ ) वालीव गाव ते रेंज ऑफिस मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,
( २ ) सातिवली खिंड ते रेंज ऑफिस या मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे,
( ३ ) रेंजऑफिस ते गोखिवरे तलाव मार्गावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे
त्याचप्रमाणे संपूर्ण वसई विधानसभा कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे खड्डे भरण्याच्या दुरुस्तीकरणाच्या कामांचा शुभारंभ १०० फुट रोड,वसई पश्चिम येथे दुपारी २.०० वाजता वसईच्या आ.स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पार पडला.
पुढील काही दिवसात सुरू करण्यात येणाऱ्या ११ रस्त्यांच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
१ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” डी,” व ” एच, ” मधील गोखिवरे तलाव ते माणिकपूर नाक्यापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
२ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” एच,” व ” आय, ” मधील माणिकपूर नाका ते दत्तानी मॉल पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
३ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” आय,” कार्यक्षेत्रातील दत्तानी मॉल ते वसई गावापर्यतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
४ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” जी,” कार्यक्षेत्रातील यालीच गाव ते रेंजऑफीस पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
५ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” आय,” कार्यक्षेत्रातील बंगली हॉस्पीटल ते देवतलाव पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
६ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” आय,” मधील पारनाका ते किल्लाबंदर जेटी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
७ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” आय,” मधील पारनाका ते वेणापट्टी पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
८ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती आय मधील पारनाका ते देवतलाव पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
९ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती “आय,” मधील दिपमाळ ते पाचूबंदर समुद्र हॉटेलपर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
१० ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” डी, ” मधील नवघर पूर्व स्मशानभूमी ते वसई ( पु.) रेल्वे स्थानक पर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
११ ) वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ” आय, ” मधील देवतलाव ते निर्मळ हिंदू स्मशानभूमी पर्यत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
या शुभांरभाच्या कार्यक्रम प्रसंगी वसई विधानसभेच्या आ.स्नेहा दुबे पंडित,बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे,वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ” जी,” चे सहा.आयुक्त श्री.निलेश म्हात्रे, प्रभाग समिती ” एच,” सहा.आयुक्त संगीता घाडीगावकर,भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार, जिल्हा सचिव प्रविण गावडे,वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष उदय शेट्टी,वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर,धरेंद्र कुलकर्णी,किरण पवार, विमल वैष्णव,दिपक शर्मा व महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते,कर्मचारी,तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.स्नेहा दुबे पंडित यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्या,“ वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. नागरिकांना दर्जेदार सुविधा, चांगले रस्ते,स्वच्छता आणि सुरक्षितता उपलब्ध करून देणे,हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.लोकांचा विश्वास आणि साथ हीआमची खरी ताकद आहे.त्या पुढे म्हणाल्या,“ वसईचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा नव्हे,तर लोकांच्या जीवनमान उंचावण्याचा प्रवास आहे.या प्रवासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
वसई विधानसभा मतदारसंघाच्या सर्व भागांमध्ये विकासकामांचा वेग वाढवण्यात आला असून, आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे. वसईचा चेहरा बदलण्याच्या दिशेने आजचा हा शुभारंभ आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

